Sunday, September 6, 2026

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना ऊस तंत्रज्ञान मेळाव्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे वतीने कारखाना कार्यक्षेत्रात घेण्यात येत असलेल्या ऊस तंत्रज्ञान मेळाव्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद दिला.

नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथे शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांच्या अध्यक्षतेखाली ऊस तंत्रज्ञान मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे जैविक प्रयोग शाळा प्रमुख डॉ.भास्करराव ताकटे यांनी हुमणी कीड नियंत्रणावर मार्गदर्शन केले.
सरपंच संदीप सुडके, प्रगतशील शेतकरी केशव वाघमारे, कचरू पऱ्हाड, नामदेव शिंदे, दिनकरचिंधे, शंकर जाधव, नारायण जाधव, संचालक रामकृष्ण कोरडे यांनी चर्चेत भाग घेतला. शेतकी अधिकारी नंदकिशोर पाटील, महेश मस्के, ॲग्री ओव्हरसियर विजय लंघे व कृषी विभाग कर्मचारी उपस्थित होते.

*डॉ.भास्करराव ताकटे…
डॉ.भास्करराव ताकटे यांनी जमिनीच्या आरोग्यासाठी माती तपासणी जिवाणू खतांचा वापर तसेच उसावरील पायरीला कीड व बंदोबस्त व हुमणी अळी संदर्भात सखोल विवेचन केले

डॉ.अशोकराव ढगे..
कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांनी पाण्याचे व्यवस्थापन तसेच नॅनो डीएपी व पोटॅशियम नायट्रेट आणि केओलीन यांच्या फवारणी संदर्भात मार्गदर्शन करून उसाचे उत्पादन वाढविण्यास संदर्भात तंत्र आणि मंत्र देऊन मार्गदर्शन केले.

मेळाव्याचे सुरुवातीला कारखान्याचे माजी संचालक काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

विजय लंघे यांनी प्रास्ताविकात प्राप्त स्थितीत उसाच्या संदर्भात मार्गदर्शनाची गरज प्रतिपादन केली नंदकिशोर पाटील यांनी ऊस लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महेश मस्के व आपण प्रयत्नशील असल्याचे आवर्जून सांगितले.
सुजित सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!