Tuesday, October 27, 2026

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक संपन्न

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर स्थापित.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अहिल्यानगर जिल्हा शाखेची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न झाली

रविवार दि.२५ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर शहरातील गरुड हॉस्पिटल येथे जिल्हा समितीचे जातपंचायत विभाग कार्यवाह कारभारी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रकाश गरुड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.
या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे उपस्थितीत होते.

बैठकीच्या सुरवातीला सामूहिकपणे चळवळीचे अभिवादन गीत गायन झाले.जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत करून बैठकी बाबतची प्रस्तावना केली.
उपस्थितांचे स्वागत -परिचय झाल्यानंतर शाखा निहाय अहवाल सादरीकरण झाले.त्यात प्रत्येक शाखेने मागील चार महिन्यात केलेल्या कामकाजाचे सादरीकरण केले.

शेवगाव तालुका शाखा प्रधान सचिव चिमाजी धनवडे, अहिल्यानगर शहर शाखेचे कार्याध्यक्ष विनायक ताकपेरे, कर्जत तालुका अध्यक्ष शब्बीरभाई पठाण, पाथर्डी तालुका तथा जिल्हा सांस्कृतिक विभाग कार्यवाह मल्हारी खेडकर, नेवासा तालुका प्रधान सचिव भाऊसाहेब सावंत यांनी सादरीकरण केले.
जिल्ह्याचा अहवाल जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा यांनी सादर केला. त्यांनी वर्गणीदार होण्यासाठी आवाहन केले.कारभारी गायकवाड यांनी स्वयं अध्ययन परिक्षेच्या संदर्भात काही सूचना मांडल्या.डॉ.गोराणे यांनी त्याबद्दल सविस्तर माहिती दिली .

महिला सहभाग विभाग कार्यवाह मेघा झावरे यांनी अंनिस कामकाज कसे चालते व कसे करावे याबाबत विचारणा केली.यावर बैठकीसाठी आलेले निरीक्षक डॉ. ठकसेन गोराणे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विचार, कार्यपद्धती, ध्येय, उद्दिष्टे (पंचसूत्री) सद्यपरिस्थितीत संघटनेत चाललेले संघटनात्मक व उपक्रमात कामकाज, पुढची दिशा, आव्हाने याबद्दल बैठकीत सविस्तर मार्गदर्शन केले.

पुढील दोन महिन्यात शिक्षकांची व कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, महिन्यातून प्रत्येक शाखेला एकदा भेट देऊन, शाखा कशी सक्षम होईल यावर भर देणे, शाखेमध्ये तरुण-तरुणी तसेच महिला सभासद नोंदणी अभियान राबविणे, शाखा निवड प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची पूर्वतयारी करणे आणि अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका वार्षिक विशेषांक २०२६ साठी जाहिराती व देणगी संकलन, वर्गणीदार करणे या विषयावर प्रामुख्याने भर देण्यात आला. शाखांची नियमित साप्ताहिक किंवा अगदीच अनिवार्य परिस्थिती पाक्षिक बैठक नियमितपणे घेण्याचे ठरले.

बैठकीसाठी सहा शाखांचे १८ सदस्य उपस्थित होते. प्रत्येकाने आपल्या मनोगतात संघटनेच्या कामाबद्दल सूचना आणि अपेक्षा व्यक्त केल्या.

अंनिस जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रकाश गरूड, नगर शहर शाखा उपाध्यक्ष भाऊसाहेब सुडके, नेवासा शाखा अध्यक्ष काॅ.आप्पासाहेब वाबळे, एम. बी.सय्यद,ए. बी.नेवसे यांनी विशेष सहभाग नोंदवला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते प्रमोद भारूळे यांनी संघटनेच्या व्यापक विवेकी विचाराच्या अंगाने केलेल्या सामाजिक कामाचे अनुभव कथन केले. त्यातून सर्वांना प्रेरणा व आनंद मिळाला.
चिमाजी धनवडे,ललित भारूळे, भावना भारूळे आदी उपस्थित होते.
अहिल्यानगर शहर शाखेच्या संविधान जागर विभागाच्या कार्यवाह गौरी गुरव यांनी सर्वांचे आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!