श्रीक्षेत्र देवगड/नेवासा
कुटुंब,कामाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी माणसाचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे गरजेचे असते. भजनाने मनाची एकाग्रता वाढते, मानसिक स्वास्थ्य चांगले होते असे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगड संस्थांनचे उत्तराधिकारी महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी केले.
नेवासा तालुक्यातील देवगड येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आज सोमवार दि.२६ ते बुधवार दि.२८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अयोजित १७ वे राज्यस्तरीय कामगार भजन प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन श्रीक्षेत्र देवगड संस्थांनचे उत्तराधिकारी महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक डॉ.क्षितिज घुले पाटील, उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे,संचालक अशोकराव मिसाळ, कामगार संचालक सुखदेव फुलारी, अंकुशराव काळे,अजय साबळे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त नंदलाल राठोड, नाशिक विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती भावना बच्छाव, संभाजीनगर विभागाचे सहायक आयुक्त भालचंद्र जगदाळे,साखर कामगार प्रतिनिधि मंडळाचे उपाध्यक्ष डी.एम.निमसे,कामगार नेते अशोकराव पवार,कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे,ज्ञानेश्वर महाराज पवार,शिबिर संचालक कृष्णा महाराज उगले,पोपटराव उगले, आदि यावेळी उपस्थित होते.
महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज पुढे म्हणाले की, कामगारांच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती निर्माण व्हावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सरकारचे हे कामगार कल्याण मंडळ काम करत आहे.‘भजन’ म्हणजे सेवा-भक्ती करणे. भजनाच्या माध्यमातून मनातील विचलित विचार थांबून ईश्वरचरणी मन जोडले जाते. कुटुंब,कामाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे गरजेचे असते. भजनाने मनाची एकाग्रता वाढते, मानसिक स्वास्थ्य चांगले होते
आ.विठ्ठलराव लंघे म्हणाले की,
भजन हे केवळ संगीत नसून परंपरा ती
जनजागृती,संस्काराची व भक्तिभावाची शाळा आहे. भजनाच्या माध्यमातून संतसंग घडतो,विचाराची प्रगल्भता वाढते. महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मार्ग अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. श्रीक्षेत्र देवगड हे स्वयंशिस्त असणारे देवस्थान आहे, कामगार कल्याण मंडळ मार्फत भविष्यात घेण्यात येणारी भजन स्पर्धा ही देवगडलाच घ्यावी अशी सूचनाही आ.लंघे यांनी यावेळी केली.
डॉ.क्षितिज घुले म्हणाले की,पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे.” हे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी आपल्याला सांगितलेले आहे. विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या अशा श्रमजीवी कामगारांच्या करिता हे कामगार कल्याण मंडल काम करिता आहे,शासनाच्या या मंडळाच्या बरोबरीने ज्ञानेश्वर उद्योग समूही कामगारांच्या कल्याणासाठी सदैव प्रयत्न करीत असल्याचे ही डॉ.घुले यांनी सांगितले.
प्रास्ताविक करतांना आयुक्त श्री. नंदलाल राठोड म्हणाले की, कामगार देशाचा कणा आणि भक्ती ही मनाची शक्ती आहे. कामगारांना शाश्रोक्त भजन, संत परंपरा, सगुण-निर्गुण भक्ती,कीर्तनचे प्रकार,पारायण याची माहिती व्हावी यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
महान संतांनी रचलेल्या अभंगांनी महाराष्ट्र भुमि पावन झालेली आहे,याच अभंगांमधून समाज प्रबोधनाचे कार्य होत आहे. हाताने काम आणि मुखाने भजन हीच संत शिकवण आहे सांस्कृतिक वारसा व संतपरंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या तीन दिवसीय निवासी शिबिरामध्ये राज्यभरातील २०० हून अधिक कामगार सहभागी झाले आहेत.
विविध स्पर्धा आणि शिबिरे घेऊन कामगारांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम कामगार कल्याण मंडळ करीत आहे असे ही श्री.राठोड यांनी सांगीतले.
कामगार कल्याण मंडळाचे अहिल्यानगर केंद्र प्रमुख अनिल बोरसे,भगवान जरारे,सत्यजित चौधरी, भास्कर शिरोळे,निलेश वाघ,शशिकांत पाटोळे,पंकज देशमुख,विवेक देशमुख,संदीप चव्हाण,राजेंद्र नांद्रे,संदीप पवार,योगेश पाटील आदि यावेळी उपस्थित होते.
कल्याण निरीक्षक महेश विभांडिक यांनी सूत्रसंचालन केले. नाशिक विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती भावना बच्छाव यांनी आभार मानले.


