अहिल्यानगर/प्रतिनिधी
अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील
साहेबराव जमन मापारी (वय ४९ वर्ष) या रुग्णाला हॉस्पिटल मधून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची फिर्याद रुग्णाचे मुलाने तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत प्रदिप साहेबराव मापारी (वय २८ वर्ष), धंदा-शेती, रा.भेंडे ता नेवासा याने तोफखाना पोलीस स्टेशनला
समक्ष खबर लिहुन देली की,
दि.१२/११/२०२६ रोजी दुपारी १७:०५ वाजेचे सुमारास माझे वडील साहेबराव जमन मापारी यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना पुढील उपचाराकरीता सिव्हील हॉस्पीटल,अहिल्यानगर येथील वार्ड नं. ११ येथे अडमीट केले होते. दि. १३/११/२०२६ रोजी माझी आई व माझा चुलत भाऊ सुभाष सर्जेराव मापारी हा माझे वडीलांसोबत सिव्हील हॉस्पीटल,अहिल्यानगर येथे होता. दि.१४/११/२०२६ रोजी सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान माझे वडील साहेबराव जमन मापारी हे कोणालाही काही एक न सांगता सिव्हील हॉस्पीटल, अहिल्यानगर येथून निघुन गेले. त्यानंतर मी नातेवाईक-मित्र यांचेकडे चौकशी केली. परंतु त्याचा काही एक संपर्क व शोध लागला नाही. तेव्हा माझी खात्री झाली कि माझे वडील साहेबराव जमन मापारी हे कोणाला कहि एक न सांगता कोठेतरी निघुन गेले आहे, त्याची आम्ही आत्तापर्यंत वाट पाहीली परंतु ते परत घरी आले नाही. म्हणून मी आज
रोजी खबर देण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो आहे.
माझ्या निघून गेलेल्या वडीलांचे वर्णन खालील प्रमाणे…
नाव साहेबराव जमन मापारी (वय ४९ वर्ष), रा.मु पो भेंडे ता नेवासा जि अहिल्यानगर,बांधा-मजबुत, चेहरा-गोल, रंग-सावळा वर्ण, उंची ५ फुट ५ इंच अंदाजे, नाक-सरळ, केस-काळे पांढरे छोटे, अंगात खाकी कलरचा शर्ट व ब्ल्यु कलरची पेंट.
तरी वर नमुद वर्णनाचे माझे वडील साहेबराव जमन मापारी (वय 49 वर्ष), रा.मु पो भेंडे ता नेवासा जि. अहिल्यानगर यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे, म्हणुन माझी अनोळखी व्यक्ती विरुध्द फिर्याद आहे.
या फिर्यादिवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गु.र.नं.०९६५/२०२६ भारतीय न्याय संहिता कमल १४०(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


