Friday, November 20, 2026

राज्यस्तरीय बुवाबाजी विरोधी महिला परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/सुखदेव फुलारी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या वतीने मंगळवार दि.२४ नोव्हेंबर २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बुवाबाजी विरोधी महिला परिषदेला अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला-पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत व कार्याध्यक्ष विष्णु गायकवाड
यांनी केले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, मंगळवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ सकाळी १० ते ५ यावेळेतमुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट,मुंबई येथे आयोजित या परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते व सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितित महा. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांचे यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेच्या प्रथम सत्राचे उद्घघाटन होणार आहे.

दुसर्‍या सत्रात ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनिल डोंगरे यांचे ‘बुवाबाजी-बळी स्त्रियांचा, एक मानसशास्त्रीय विश्लेषण’ या विषयावरील व्याख्यान होईल.
तिसर्‍या सत्रात, ‘जेन-झी टॉक ऑन बुवाबाजी’ या विषयावरील परिसंवादात प्रियांका खेडेकर, हरी आवळे, शितल वसावे, गौरी जाधव हे तरुण कार्यकर्ते भाग घेणार आहेत. परिषदेचे समारोप-सत्र ज्येष्ठ साहित्यिका प्रा.नीरजा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या सत्राचे अध्यक्ष महा. अंनिसचे राज्य अध्यक्ष माधव बावगे हे असतील.

परिषदेच्या नियोजनासाठी महा. अंनिसच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य कार्यवाह अड. रंजना गवांदे, सहकार्यवाह विष्णू लोणारे, महिला सहभाग विभागाच्या राज्य कार्यवाह गायत्री आडे,रुपेश शोभा तसेच राज्य प्रधान सचिव विजय परब, सरचिटणीस आरती नाईक, नंदकिशोर तळाशीलकर, यश सूर्यवंशी,डॉ.सुषमा बसवंत, संदीप गायकवाड, राजेंद्र पंडित इत्यादि कार्यकर्ते विशेष प्रयत्न करीत आहेत. राज्यभरातून ५०० पेक्षा अधिक महिला, पुरुष या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली ३७ वर्षे अंधश्रद्धा निर्मूलनाचे आणि व्यापक सामाजिक परिवर्तनाचे कार्य संघटितपणे करीत आहे. संघटना सुरुवातीच्या काळापासूनच बुवाबाजीला ठाम विरोध करीत आलेली आहे. आत्तापर्यंत संघटनेच्या पुढाकाराने १५०० पेक्षा अधिक गुन्हे जादूटोणाविरोधी कायद्या अंतर्गत दाखल केलेले आहेत. यातील काही भोंदू बुवा, बाबा, मांत्रिकांना या कायद्यानुसार शिक्षाही झालेली आहे.

प्रसिद्धी पत्रकावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सल्लागार काॅ.बाबा आरगडे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत, कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, उपाध्यक्ष प्रमोद भारूळे, उपाध्यक्ष डॉ. प्रकाश गरूड, प्रधान सचिव विनायक सापा,सोशल मिडिया कार्यवाह सुखदेव फुलारी, शशिकांत गायकवाड, अॅड. अभय राजे, अशोक गवांदे, कारभारी गायकवाड, छायाताई बंगाळ, बी.के.चव्हाण, दिपक शिरसाठ, मल्हारी खेडकर, देवदत्त साळवे आदिंच्या सहया आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!