नागेबाबा मल्टिस्टेटच्या विचारधन २०२७ दिनदर्शिकेचे प्रकाशन
अहिल्यानगर/प्रतिनिधी
श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटीच्या आगामी २०२७ या नवीन वर्षाच्या नागेबाबा विचारधन दिनदर्शिकेचे प्रकाशन रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते झाले.
अहिल्यानगर येथील कॉर्पोरेट ऑफिस मध्ये दि.१७ रोजी झालेल्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे, आर्टिस्ट ज्ञानेश शिंदे,संतोष शर्मा,
तज्ञ संचालक सीए अमित फिरोदिया,
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कदम, जनरल मॅनेजर भरत दारुंटे, यांचेसह नागेबाबा परिवाराचे सदस्य उपस्थित होते.


