Friday, November 20, 2026

कुकाण्यात ११.१८२ किलो गांजासह  एका आरोपीला अटक 

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील कुकाणा  येथे घरातून गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला  स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून   ११.१८२ किलो गांजा जप्त केला.

याबाबद अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन
यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुषंगाने   स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सपोनि हरिष भोये व पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, विकास साळवे, अशोक लिपणे, शामसुंदर जाधव, मनोज साखरे व नंदिनी झिने यांचे पथक तयार करून जिल्हयातील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन, कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
दि.१९/११/२०२६ रोजी पथक नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, शाहमद मेहबुब शेख, रा. मुलानीवाडा, जुम्मा मस्जीदजवळ, कुकाणा, ता.नेवासा याचे घरामध्ये गांजा असून तो त्याची विक्री करत आहे. पथकाने मिळालेली गोपनीय माहिती नेवासा पोलीस स्टेशनला लेखी अहवालाद्वारे कळविली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे आदेशान्वये सपोनि अमोल पवार, नेवासा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक कारवाई करण्याकरीता पंचासह आवश्यक त्या साहित्यासह मिळालेल्या माहितीतील शाहमद मेहबुब शेख याचे राहते घरी जाऊन पंचासमक्ष घराची पाहणी केली. घरामध्ये गांजा मिळून आल्याने  शाहमद मेहबुब शेख (वय ४८ वर्षे), रा. मुलाणीवाडा, जुम्मा मस्जीदजवळ, कुकाणा, ता. नेवासा, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.

ताब्यातील आरोपीचे घरातून ५ लाख ५९ हजार १०० रूपये किंमतीचा त्यात तीन गोण्यामधील ११ किलो १८२ ग्रॅम वजनाचा गांजा,  १ हजार रूपये किंमतीचा एक वजन काटा, ३०० रूपये किंमतीची  वजन मापे, २००  रूपये किंमतीचे स्टीलचे भांडे, १०० रूपये किंमतीच्या प्लॅस्टीक पिशव्या असा एकुण ५ लाख ६० हजार ७०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पथकाने ताब्यातील आरोपीकडे जप्त मुद्देमालाबाबत अधिक विचारपूस करता, आरोपीने जप्त मुद्देमाल हा  मल्हारी मोहन बोरूडे, रा.मजलेशहर, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर याचेकडून खरेदी केला असल्याची माहिती सांगीतली, आरोपीने सांगीतलेल्या माहितीवरून पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. आरोपीस मुद्देमालासह नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केले असून त्याचेविरूध्द नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ९४८/२०२६ गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), २० (२) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला.

वरील कारवाई  पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!