अहिल्यानगर/प्रतिनिधी
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थित आज दि.२७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ऊस दर निश्चिती बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सोलापूरचाच फॉर्मुला लागू करण्यात आला असून गळीतास आलेल्या ऊसाला प्रति टन ३२५० रुपये पहिली उचल, मार्च महिन्यात प्रतिटन १०० रुपये आणि साखरेला सध्याचाच प्रतिकिलो ५० रुपये किलो भाव कायम राहिल्यास प्रतिटन १०० रुपये असे एकूण ३४५० रुपये प्रतिटन ऊस दर देण्याचे निश्चित झाल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रतिटन रु.३४५० हा कमीत कमी ऊस दर आहे,हा भाव देणे सर्व साखर कारखान्याना बंधनकारक आहे.मात्र या पेक्षा जास्त भाव देत असेल तर त्या करखान्याला शेतकऱ्यांनी ऊस द्यावा असा सल्ला ही श्री.शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला.
https://www.facebook.com/share/v/1JJRW8dHLF/


