Monday, October 14, 2024

घोगरगांव येथील शेतरस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी नेवासा तहसिल कार्यालयासमोर वंचित बहूजन आघाडीचे अमरण उपोषण सुरु

नेवासा

नेवासा घोगरगांव येथील शेतरस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी वंचित बहूजन आघाडीच्यावतीने नेवासा तहसिल कार्यालयासमोर मंगळवार दि.२३ रोजी सकाळी ११ वाजता वंचित बहूजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पोपटराव सरोदे यांच्या नेत्तृत्वाखाली अमरण उपोषण सुरु करण्यात आलेले असून शेतरस्ता खुला करण्याची मागणी यावेळी उपोषणकर्त्यांनी तहसिलदार यांच्याकडे केली आहे.

गेल्या पाच वर्षांपुर्वी घोगरगांव येथील गट क्रमांक २५५ मधील शेत रस्ता खुला करुन देण्याचा आदेश नेवासा तहसिलदारांनी दिलेला असतांनाही हा शेत रस्ता अद्यापही खुला झालेला नाही त्यामुळे बहात्तर वर्षिय वृद्ध महिल शकुंतला अण्णासाहेब कणगरे यांच्या अल्पवयिन नातवही या उपोषणात सहभागी झालेले अाहेत ‘आम्हाला शाळेत जाण्या – येण्यासाठी रस्ता’ खुला करुन देण्याची हाक या चिमुकल्यांकडून दिली जात अाहे तरी प्रशासनकडून अद्यापही शेतरस्ता खुला करुन देण्यासाठी कार्यवाही करण्यात न आल्यामुळे वंचित बहूजन आघाडीच्यीवतीने तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु करण्यात आलेले आहे.या उपोषणात सतिष कणगरे,नितीन गोर्डे,योगेश गायकवाड, रविंद्र कणगरे किरण कणगरे यांच्यासह गावातील नागरिक उपोषणात सहभागी झालेले असून या उपोषणाला मराठा महासंघ,विविध संघटनांनी पाठींबा दिलेला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!