Monday, October 14, 2024

हिवाळी श्रमसंस्कार शिबीर म्हणजे बिगर भिंतीची शाळा-माजी आ.पांडुरंग अभंग

नेवासा

महाविद्यालयाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबीर म्हणजे बिगर भिंतीची शाळा असल्याचे प्रतिपादन लोकनेते मारुतराव
घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग यांनी केले.

भेंडा येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय आयोजित श्रमसंस्कार शिबीराचे नजीक चिंचोली येथे उद्घाटन दि.३० जानेवारी रोजी श्री.अभंग यांचे हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते.गणेशानंद महाराज, भागचंद महाराज पाठक,काशीनाथ नवले,अशोकराव मिसाळ, डॉ.अशोकराव ढगे, भागचंद चावरे, ईश्वर पाठक,मिनीनाथ धाडगे, बाळासाहेब पाठक, संजय पाठक, संजय आढागळे, दिगंबर पाठक, दत्तात्रय गोंधळी,प्रभारी प्राचार्य डॉ. शिरिष लांडगे, उपप्राचार्य डॉ रमेश नवल,कार्यक्रम अधिकारी डॉ. अब्दुललतिफ शेख, प्रा योगेश लबडे प्रा.विकास कसबे हे उपस्थित होते.

श्री.अभंग पुढे म्हणाले की ,शिबीरात योग अभ्यास, आहार विहार चे महत्व, शिस्त पालन चे महत्व,मनाची स्वच्छतेला महत्त्व द्या चिंता मुक्त मन असेल तरचं कर्तृत्व करू शकतो.प्रतीकुल परिस्थिती गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांनी ग्राम स्वच्छतेला महत्त्व दिले. मुलांना चांगले शिक्षण द्या हे गाडगेबाबा सांगत,ते म्हणाले होते की शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे.उच्च शिक्षीत झाले तरी गर्व करू नका,आई -वडीलांना जपा . शिक्षणाला अध्यात्माची जोड द्या.लोकनेते मारूतराव घुले पाटील हे नेहमी सांगत असे की जरी चंद्र सूर्य आले हाती तरी विसरू नकोस पायाखालची माती.

राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा विभाग समन्वयक प्रा.डॉ संजय महेर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा.डॉ.मोहिनी साठे यांनी सूत्रसंचालन
केले .

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!