Wednesday, February 21, 2024

आरे देवा:फेब्रुवारीतही पाऊस; हवामान विभागाचा इशारा

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:डिसेंबर आणि जानेवारीत नेहमीपेक्षा कोरडेपणा अनुभवल्यानंतर वायव्य भारतात फेब्रुवारीमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा

जास्त पाऊस पडेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) बुधवारी सांगितले.पत्रकार परिषदेला संबोधित करताना आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा सांगितले की, फेब्रुवारीमध्ये

भारतात एकत्रितपणे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. वायव्य भारतात जानेवारीमध्ये फक्त ३.१ मिमी पावसाची नोंद झाली, जी १९०१ नंतरची दुसरी सर्वांत कमी नोंद आहे. सात हवामानशास्त्रीय उपविभागांचा समावेश असलेल्या वायव्य भारतात

फेब्रुवारीमध्ये सामान्यपेक्षा जास्त (दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या १२२ टक्क्यांहून अधिक) पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य आणि मध्य भारतात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. दक्षिण द्वीपकल्पीय भारतात

सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशातील बहुतांश भागामंत किमान तापमान सामान्यपेक्षापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!