माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. जिल्ह्यात खुन,दरोडे, अत्याचार यामध्ये वाढ होताना दिसत आहे.अशीच एक धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे .
त्यामुळे नगर जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.नगर जिल्ह्यात महिलेवर पोलिस शिपाई व होमगार्ड अशा दोघांनी अत्याचार केल्याची घटना घडली. जामखेड तालुक्यातील नायगाव
येथे ऊस तोडणीचे काम करणाऱ्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.पोलिस शिपाई दगडू सुदाम भुरके, होमगार्ड सागर चंद्रकात माने अशी आरोपींची नावे असून, दोघांना अटक करण्यात
आल्याची माहिती पोलिसांनी दिली. भूम बसस्थानक परिसरात शिपाई व होमगार्डने पीडित महिलेला पैशांची मागणी केली. महिलेने ऊसतोडणी मुकादमाला फोन करुन पैसे मागितले. मुकादमाने माने
याच्या फोन- पेला दहा हजार पाठविले. त्यानंतर शिपाई दगडू भुरके याने महिलेला शेतात तिच्यावर अत्याचार केला.