Tuesday, April 22, 2025

भारतपे’ (BharatPe) वापर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी…

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:फिनटेक कंपन्यांसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेटीएमनंतर आता ‘भारतपे’ (BharatPe) संकटात सापडले आहे. कॉर्पोरेट मंत्रालयाने भारतपेला नोटीस बजावली आहे.

मंत्रालयाने कंपनी कायद्याच्या कलम 206 अंतर्गत नोटीस जारी केली आहे. तसेच, अशनीर ग्रोव्हर प्रकरणात भारतपेकडून माहिती मागवली आहे. दरम्यान, तपासात सरकारला पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

मनीकंट्रोलच्या म्हणण्यानुसार, कॉर्पोरेट मंत्रालयाने ‘भारतपे’ला नोटीस बजावली असून अशनीर ग्रोवरविरुद्ध न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी आणि दिवाणी प्रकरणांशी संबंधित पुरावे काय आहेत, अशी

विचारणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अशनीर ग्रोव्हरने ‘भारतपे’ची स्थापना केली होती. नंतर अशनीर ग्रोव्हर आणि त्याच्या पत्नीवर कंपनीच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यांना कंपनीच्या संचालक मंडळातून काढून टाकण्यात आले.

सरकारच्या नोटीसवर ‘भारतपे’ कंपनीने म्हटले आहे की, मंत्रालयाने कंपनीला नोटीस बजावली आहे. अशनीर ग्रोव्हर प्रकरणात अधिक माहिती मागवली आहे. सरकारने 2022 मध्ये या प्रकरणाचा आढावा सुरू केला

होता आणि ही चौकशी पुढे नेत असताना अतिरिक्त माहिती मागवली होती. तसेच, आम्ही तपास यंत्रणांना शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करू, असे कंपनीने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

‘भारतपे’ची सुरुवात अशनीर ग्रोव्हरने 4 वर्षांपूर्वी केली होती. 2022 च्या सुरुवातीला अशनीर ग्रोव्हर विरुद्धचा वाद सुरू झाला. अशनीर ग्रोव्हरने कोटक ग्रुपच्या एका कर्मचाऱ्याला नायकाचा आयपीओ दिला नाही

म्हणून धमकावले होते. वाद वाढत असताना अशनीर ग्रोव्हर यांनी भारतपेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला. यानंतर कंपनीने अशनीरविरुद्ध आर्थिक हेराफेरीबाबत ऑडिटही सुरू केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!