माय महाराष्ट्र न्यूज:देशातील कोट्यवधी नोकरदारांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय
विश्वस्त मंडळाने (CBT) भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर निश्चित केला आहे. विशेष म्हणजे यंदा नोकरदारांना मागील 3 वर्षांतील सर्वाधिक व्याजदर मिळणार आहे. ईपीएफओने सन 2023-24 साठीच्या
पीएफ ठेवींवर 8.25 टक्क्यांनी व्याज दिलं जाणार असल्याची घोषणा केली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. मागील वर्षी 28 मार्च रोजी ईपीएफओने सन 2022-23 साठी 8.15 टक्के दर
जाहीर केला होता. 2021-22 रोजी हाच दर 8.10 टक्के इतका होता.मागील वर्षी 28 मार्च रोजी EPFO ने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यांवर 8.15 टक्के व्याज जाहीर केलं होतं.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये वितरणासाठी 90, 497.57 कोटी रुपयांचं उत्पन्न उपलब्ध होते. सभासदांच्या खात्यात व्याज जमा केल्यानंतर 663.91 कोटी रुपये सरप्लस होता. नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार
आता EPFO व्याजदर सार्वजनिकपणे अर्थ मंत्रालयाच्या परवानगीनंतरच जाहीर केले जातील.गेल्या वर्षी जुलैमध्ये कामगार मंत्रालयाने CBT ला अर्थ मंत्रालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय 2023-24 या
आर्थिक वर्षातील व्याजदर जाहीरपणे जाहीर करू नये, असं सांगितलं होतं. याशिवाय उच्च निवृत्ती वेतन, ईपीएफओमधील रिक्त पदांवर भरती आणि ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या
आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.