Saturday, December 21, 2024

मुंबई हायकोर्टातील पदाचा पेपर फुटला, सायबर ठाण्यात गुन्हा दाखल

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुंबई उच्च न्यायालयाच्या वैयक्तिक सहायक पदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार शनिवारी घडला. या पदासाठी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील सेंटरवर

परीक्षा घेण्यात आली. या प्रकरणी टेलिग्राम आणि व्हॉटसअपवर एका चॅनलच्या अॅडमिनच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, न्यायधीशांच्या स्वीय सहायकाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली.

यात श्रुतलेखन चाचणीच्या संदर्भात चार फेब्रुवारी रोजी प्रदेशनिहाय परीक्षा आयोजित करण्यात आले होते. ही परिक्षा सकाळी नऊ वाजेपासून सुरू झाली. मुंबई येथील प्रिन्सिपल सीटच्या निर्देशानुसार, या कार्यालयाने छत्रपती छत्रपती संभाजीनगर येथे

लघुलेखन चाचणी नऊ बॅचमध्ये (परिशिष्ट ‘ब’) आयोजित केली होती. ज्यासाठी ८३० उमेदवार उपस्थित होते. चौथ्या तुकडीची चाचणी संपण्याच्या मार्गावर होती, दुपारी १:२५ च्या सुमारास या परीक्षेत एका उमेदवाराने

डेप्युटी रजिस्ट्रारसह परीक्षा घेणाऱ्या पर्यवेक्षकांना समाजमाध्यमावर श्रुतलेखन परीक्षेतील मजकूर हा एका उमेदवाराच्या मोबाइलवर पाहिल्याची माहिती दिली.या माहितीवरून या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आली.

हा पेपर फुटीचा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणात उच्च न्यायलयाच्या वैयक्तिक सहायक पदाच्या परीक्षेच्या श्रुतलेखन चाचणीच्या संदर्भात झालेल्या गैरप्रकारांच्या घटनेचा अहवाल आणि सार्वजनिक व्यासपीठावर प्रकाशित करण्यात आले. या प्रकरणात कोर्टाचे

रजिस्ट्रार (प्रशासन) सुधीर श्रीनिवास कानडे यांच्या तक्रारीवरून टेलिग्राम चॅनल अॅडमिनचे नाव संशयित अशफाक (मोबाइल क्रमांक ९१७२ ५१ ४१६१, ८१८०८९५६२७) याच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास प्रभारी पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्याकडे या प्रकरणाचा तपास करण्यात आला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!