माय महाराष्ट्र न्यूज:राजकारण हे चांगल्याच माणसांचे काम आहे, हे सिद्ध करण्यासाठी जय बाबाजी परिवार सज्ज झाला आहे.लढायचं आणि जिंकायचं, असा नारा देत देशभक्तीपर गीतांच्या साथीत
महामंडालेश्वर शांतिगिरी महाराज यांना येत्या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून विजयी करण्याचा निर्धार शनिवारी (ता. १०) व्यक्त करण्यात आला.
हनुमानवाडी परिसरातील श्रद्धा लॉन्सवर महाराजांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याला जय बाबाजी भक्त परिवार हिंदुत्ववादी ड्रेसकोडसह मोठ्या संख्येने उपस्थित होता. लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध
राजकारणाचा असा विचार घेऊन जय बाबाजी भक्त परिवाराने कुठल्याही परिस्थितीत महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांना विजयी करण्यासाठी आता ‘लढायचं आणि जिंकायचं’ असा निर्धार शनिवारच्या मेळाव्यात केला.
मेळाव्यासाठी राज्यभरातून जय बाबाजी भक्त परिवाराचे सदस्य आले होते. हनुमानवाडी परिसरातील श्रद्धा लॉन्स येथे निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित
महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत भक्त परिवारातील उपस्थित प्रमुख प्रतिनिधींची बैठक झाली.स्वतःच्या खर्चाने व घरचा जेवणाचा डबा घेऊन भगवा शर्ट, जय बाबाजी नावाची टोपी घालून
एका ड्रेसकोडमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते. राज्यभरातून विविध जिल्ह्यांतील प्रमुख भाविक दोनदिवसीय बैठकीस उपस्थित होते.बैठकीनंतर जय बाबाजी भक्त परिवारातील भाविक आपल्याला मिळालेल्या भागातील प्रचारासाठी
रवाना झाले. राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून आलेले भाविक मतदारांबरोबरच आपल्या नातेवाइकांचीही भेट घेऊन बाबाजींची राष्ट्रहितासाठीची भूमिका हा परिवार समजावून सांगणार आहे.