माय महाराष्ट्र न्यूज:राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक
चव्हाण यांनी काल(सोमवारी) काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर यांनी देखील भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं. अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. चव्हाणांच्या प्राथमिक सदस्य पत्रावर बावनकुळे यांनी सही करत भाजपमध्ये प्रवेश दिला आहे.
गेली तीन दशकं काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी काम करणारे, बालपणापासूनच काँग्रेसी विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा हात सोडत अशोक चव्हाण
यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. चव्हाण यांचे समर्थक अमर
राजूरकर यांनीही आज भाजपत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजप प्रदेश कार्यालयात उपस्थित होते.