Wednesday, May 13, 2026

भेंडा येथील मुळा उजव्या कालव्यात बुडालेल्या तरुणाचा दुसऱ्या दिवशीही शोध सुरूच

IMG-20260511-WA0029
IMG-20260511-WA0029
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक परिसरात मुळा उजव्या कालव्यात बुडालेल्या स्वप्नील लक्ष्मण मगरे (वय ३२ वर्षे) रा पाथरवाला,ता.अंबड या तरुणाचा सलग दुसऱ्या दिवशीही शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरूच आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की,
मुळा उजव्या कालव्याला सध्या आवर्तन सुटलेले असल्याने पाण्याचा प्रवाह मोठा आहे.
मित्रांसोबत मढीकडे जातअसताना मंगळवार दि.१७ मार्च रोजी स्वप्नील लक्ष्मण मगरे (वय ३२ वर्षे) रा. पाथरवाला, ता.अंबड,जि. जालना हा तरुण सकाळी भेंडा येथे
मुळा उजव्या कालव्यात अंघोळ करण्यासाठी उतरला असता पाय घसरून कालव्यात पडला.
त्याच्या सोबत असलेल्या इतर तरूणांनी या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना व पोलिसांना दिली.
डॉ. संजय बिरादार व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक पवार व स्थानिक प्रशासन, पोलीस आणि पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने कालव्याच्या पात्रात शोध घेतला गेला. रात्र झाल्याने तपास थांबविण्यात आला. दुसऱ्या दिवशी बुधवार दि.१८ रोजी सकाळ पासूनच तपास सुरू करण्यात आला. तहसीलदार डॉ. संजय बिरादार, उपनिरीक्षक श्री.पवार हे नगरहुन आलेल्या अग्निशमन दलाचे जवान व रेसिक्यु टीमसह घटनास्थळी दाखल झाले असून बोट, टायर आणि गळाचे सहाय्याने कालव्याचे पाण्यात शोध कार्य सुरू करण्यात आले आहे.
पाण्याचा वेग जास्त असल्याने आणि कालव्याची खोली अधिक असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत.
कालव्यातील पाण्याचा विसर्ग कमी करून शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, अद्याप तरुणाचा ठावठिकाणा लागलेला नाही.

भेंडा येथील युवा नेते किशोर मिसाळ, पाथरवाला गावातील स्वप्नीलचा मित्र परिवार, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झालेले असून शोध मोहीम राबवित आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!