Sunday, October 6, 2024

शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का बसणार?, मोठा नेता भाजपच्या वाटेवर; ‘त्या’ नेत्याचा खुलासा काय

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अशोक चव्हाण भाजपवासी होणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजकीय भूकंपाने

काँग्रेस हादरलेला असतानाच आता शरद पवार यांनाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचा एक मोठा नेता भाजपमध्ये येणार आहे. भाजपच्या एका बड्या मंत्र्यानेच तसा दावा केला आहे.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, ज्या नेत्याबाबत चर्चा सुरू आहे, त्याने या चर्चेत तथ्य नसल्याचा दावा केला आहे.

राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी हा दावा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना हा दावा केला आहे.

भाजपमध्ये येण्यासाठी खडसे यांचे खूप निरोप येत आहेत. भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसे यांचे फार जोर लावून प्रयत्न चालले आहेत. असं मला कळतंय. त्याबाबत मला दिल्ली आणि राज्याकडूनही कळतंय.

मात्र, मला याबाबत काहीच विचारणा झालेली नाही. तसे प्रयोजनही दिसत नाही. खडसे यांना घ्यायचं की नाही याबाबत मला विचारण्यात आलेलं नाही. कारण मी छोटा कार्यकर्ता आहे. पण वर जर त्यांची

काही लाईन असेल हॉट लाईन असेल तर ती त्यांनी लावावी. वरून सिग्नल मिळाला तर चांगलंच आहे, असं सूचक विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे. त्यामुळे खडसे हे शरद पवार यांना सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपात प्रवेश करणार या केवळ अफवाच आहेत. माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा या हेतूने अफवा पसरवल्या जात आहे, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करून हा खुलासा केला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!