Sunday, May 19, 2024

मोबाईलमधील ‘या’ पाच अ‍ॅप्स लगेच करा डिलीट ; नाहीतर

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन फसवणुकीचं प्रमाण वाढले आहे, दररोज ऑनलाईन स्कॅमच्या बातमी येत असतात. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी

सरकार सातत्याने नवनवीन पावले उचलत असते. सायबर गुन्ह्यांमुळे लोकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये गायब झालेले आपण अनेकदा ऐकले आहे. अशा फसवणुकीविषयी सायबर क्राईम पोलीस

नेहमीची नागरिकांना सुचना देत असतात. तसेच याबाबत सार्वजनिक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये ‘ऑनलाइन ट्रेडिंग स्कॅम’ संदर्भात काही माहिती देण्यात आली आहे.

फ्रॉड करणारे लोक व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले शिकार शोधत असतात. स्कॅम करणारे फोनवर जाहिरातीचा मेसेज पाठवत असतात. यामध्ये मोफत ट्रेडिंग टिप्स क्लास देण्याचे

सांगितले जाते. या यानंतर ते युझर्सशी संवाद साधतात आणि वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या टिप्स देतात.युझर्सचा विश्वास संपादन केल्यानंतर स्कॅम करणारे युझर्सला ॲप इन्स्टॉल करण्यास सांगतात.

हे ॲपच्या मदतीने स्कॅम करणारे युझर्सचे मोबाईल हॅक करतात. युझर्सची सर्व वैयक्तिक माहिती या अॅपच्या मदतीने मिळवत असतात. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ‘ युझर्सने

INSECG, CHS-SES, SAAI, SEQUOIA आणि GOOMI नावाचे ॲप्स इन्स्टॉल केले आहेत.हे ॲप्स सेबी सिक्युरिटी बोर्ड अंतर्गत नोंदणीकृत नाहीत. या अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास सांगितले जाते.

सुरुवातीला नफा दाखवला जातो.नंतर युझर्सची फसवणूक होत असते. याविषयी पोलिसांनी पुढे सांगितले की, ‘युझर्स नोंदणीकृत हेतूने स्टॉक ट्रेडिंग करू लागतात. कारण या ॲपची रचना अशा प्रकारे

करण्यात आलीय. डिजिटल वॉलेटमध्ये बनावट नफा दाखवला जातो. उर्वरित पैसे बँक खात्यात जमा केले जातात.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!