माय महाराष्ट्र न्यूज:राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपानेमहाराष्ट्रातील उमेदवार जाहीर केले आहेत. कालच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाणांची यात वर्णी लागली आहे.
त्यासोबत पुण्याच्या कोथरूड मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनाही यात स्थान मिळाले आहे. त्यासोबत नांदेडचे डॉक्टर अजित गोपछडे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यसभा निवडणुकीसाठी गुजरात आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात दाखल झालेले अशोक
चव्हाण यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. तसेच मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांनादेखील महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि प्रकाश जावडेकर
यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गोविंदभाई ढोलकिया, मयंकभाई नायक, डॉ. जशवंतसिंह सलामसिंह परमार यांना गुजरातमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केल्यानंतर राज्यसभेच्या उमदेवारीची समीकरणे बदलली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पीयूष गोयल यांना लोकसभा रिंगणात उतरवले
जाणार आहे. राज्यसभेला भाजप एक जादा उमदेवार देत आहे. अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केल्यानंतर
राज्यसभेच्या उमदेवारीची समीकरणे बदलली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पीयूष गोयल यांना लोकसभा रिंगणात उतरवले जाणार आहे. राज्यसभेला भाजप एक जादा उमदेवार देत आहे.
अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.नारायण राणे व अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे काँग्रेसमध्ये असल्यापासून वितुष्ट होते. अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केल्याने राणेंनी त्या काळी टीकेची
झोड उठवली होती. त्यानंतर तब्ब्ल ८० दिवस राणे मंत्रिमंडळाबाहेर होते. ८० दिवसांनंतर उद्योगमंत्रिपद देऊन राणेंना मंत्रिमंडळात घेण्यात आले होते.