Monday, May 27, 2024

विद्यार्थी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; मंत्रिमंडळ बैठकीतील १० महत्त्वाचे निर्णय

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडली. आजच्या बैठकीत महत्त्वाचे १० निर्णय घेण्यात आले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतनात भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना दरमहा १८ हजार रुपये मिळणार आहेत.

याशिवाय ग्रामविकास विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत अतिरिक्त ७००० किमी रस्ते आणि पुलाची कामे करण्याची निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीत आणखी कोणते निर्णय घेण्यात आले यावर एक नजर टाकूया.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय?

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त ७ हजार किमी रस्ते व पुलाची कामे. (ग्रामविकास विभाग)

ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण. ना नफा ना तोटा तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार. (महसूल विभाग)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतनात भरीव वाढ. आता मिळणार दरमहा १८ हजार. (वैद्यकीय शिक्षण विभाग) (Latest Marathi News)

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा. (वित्त विभाग)

उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा. विशेष प्रोत्साहने देणार. राज्यातील कमी विकसित भागांना फायदा. (उद्योग विभाग)

सायन कोळीवाडातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा पुनर्विकास करणार. म्हाडा करणार विकास. (गृहनिर्माण विभाग)

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना. (सामाजिक न्याय विभाग)

राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय. (वैद्यकीय शिक्षण विभाग)

एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार. मुद्रांक शुल्क माफीमध्ये लीजचा समावेश. (उद्योग विभाग)

भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय. (सामाजिक न्याय विभाग)

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!