नेवासा
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील रहिवाशी असलेले आरोग्य सल्लागार अर्जुन रामचंद्र सुसे यांना साऊथर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.
डॉ.अर्जुन सुसे हे गेल्या अनेक वर्षांपासून “हेल्दी अँड हॅपी फॅमिली” हे व्हिजन घेऊन आरोग्य सल्लागार म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत.
आज पर्यंत त्यांनी एक लाखापेक्षा जास्त परिवाराला आरोग्य या विषयाबद्दल जागरूकता करून त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना हेल्दी आणि हॅपी फॅमिली बनविल्या . आज त्या सर्व फॅमिली आरोग्यदायी आनंददायी आहेत . हे समाज समाज हिताचे व राष्ट्रहिताचे काम करत असताना त्यांच्या सोबत १० हजार आरोग्य सल्लागार कार्य करत आहेत.आजही दररोज सकाळी व संध्याकाळी लोकांना मोफत ऑनलाईन आरोग्य मार्गदर्शन करतात.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन साऊथर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीने त्यांना “डॉक्टरेट इन वेलनेस मॅनेजमेंट” ही
मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.
रविवार दि.१८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता नगर येथील विठाई लॉन्स, गाढळकर मळा येथे नागेबाबा परिवार व समता परिवाराचे वतीने श्रीक्षेत्र ज्ञानेश्वर संस्थांनचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग व नागेबाबा परिवाराचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांचे प्रमुख उपस्थितीत डॉ.सुसे यांना पदवी प्रदान व गौरव सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.