Tuesday, October 15, 2024

मोफत वीज! आतापर्यंत ६० हजार जणांनीच Apply केलाय? पीएमसूर्यघर योजनेचा कसा लाभ घ्याल…

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारने १ कोटी लोकांना दर महिन्याला ३०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. ही योजना मोफत वीजच नाही तर कमाईची संधी देखील देणार आहे.

सोबतच रोजगाराची संधीदेखील उपलब्ध होणार आहे. या योजनेत कसा अॅप्लाय करायचा? पैसे कसे कमवायचे? तुमचे पैसे किती लागणार या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळणार आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे ही वीज मोफत म्हटली असली तरी ती मोफत असणार नाहीय. तुम्हाला तुमच्या खिशातून काही रक्कम गुंतवावी लागणार आहे. अर्ज केल्यानंतर तुमच्या खात्यात सबसिडी वळती केली

जाणार आहे. तसेच तुमच्यावर खूप भार पडू नये म्हणून केंद्र सरकार सवलतीच्या व्याजाने बँकांचे कर्जही उपलब्ध करणार आहे.तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन रजिस्टर करावे लागणार आहे.

यासाठी तुम्हाला https://pmsuryaghar.gov.in वर अप्लाय करावा लागणार आहे.या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला Rooftop Solar वर क्लिक करून अल्पाय करायचे आहे. यासाठी तुम्हाला रजिस्टर करावे लागणार आहे.

तुमचे राज्य, इलेक्ट्रीसिटी बोर्ड, तुमचा ग्राहक क्रमांक आदी भरावे लागणार आहे. तुम्हाला किती किलोवॅटची मंजुरी मिळणार, किती खर्च येणार याचा कॅल्क्युलेटरही उपलब्ध करण्य़ात आला आहे.

इथे जाऊन तुम्हाला रजिस्टर करावे लागणार आहे. (क्लिक करा)https://pmsuryaghar.gov.in/consumerRegistration क्विक लिंकमध्ये सबसिडी स्ट्रक्टर, सोलार पॅनेल पुरवठादार आदींची माहिती मिळणार आहे.

या वेबसाईटवर तुम्हाला उजवीकडे Know More About Rooftop Solar असे दिसेल. तिथे कॅल्क्युलेटर, डॉक्युमेंट्स आणि व्हिडीओची लिंक देण्यात आली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!