Wednesday, August 17, 2022

नगर जिल्ह्यातील ‘ते’ लग्न भोवले नवरदेवासह २५ जणांना कोरोनाची लागण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णवाढीच्या बाबतीत जिल्हा पाहिल्या रांगेत राहिला.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यात कडक नियम लागू केले.

अनेक कार्यांसाठी काही नियम आहेत. यात लग्न समारंभाचाही समावेश आहे.परंतु आता एका लग्नाने सर्वांचीच झोप उडाली आहे. अहमदनगरमधील राहुरी तालुक्यातील एका गावात झालेल्या लग्नात तब्बल नवरदेवासह २५ व्यक्ती बाधित निघाले आहेत.

अधिक माहिती अशी : राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील कणगर गावातील एका वस्तीवर दोन दिवसांपूर्वी लगाम सभारंभ पार पडला. दोन्ही वऱ्हाडी मंडळी एकाच वस्तीवरील होते.लग्नानंतर हळद फेडण्याचा कार्यक्रम झाल्या नंतर नवरदेवास ञास जाणवू लागला.

त्यानंतर देवळाली प्रवरा येथील सहारा कोविड सेंटर मध्ये नवरदेवाची कोरोना चाचणी करण्यात आली.तेथे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर नवरदेवाचे कलव्हरे व कलव्हरी यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन कलव्हरी बाधित निघाल्या त्यांना देवळाली येथील सहारा कोविड सेंटर मध्ये रवानगी करुन विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले.

नवरदेव नवरी व कलव्हरी बाधित आल्याने सरपंच सर्जेराव घाडगे यांनी प्रशासनाच्या मदतीने लग्न ठिकाणाच्या दोन्ही वस्तीवर कोरोणा रॅपिड टेस्ट कॅम्प भरवून लग्न सभारंभासाठी हजर असलेल्या सर्वांची तपासणी केली. यात एकूण २२ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले असूनत्यांना राहूरी कृषी विद्यापीठाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान सरपंच घाडगे यांनी सांगितले की, सदर बाधीत रूग्ण हे एका वस्तीवरील असून त्यांना उपचारासाठी दाखल केले असूनगावातील नागरीकांनी घाबरून न जाता स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!