Monday, May 27, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोल्हापूरमधील महा अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या आमदारांवर 50 खोके एकदम ओके अशी टीका केली. याचाच धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 कोटी मागितल्याच्या एका पत्राबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नेमकं कोणी पाठवलं होतं? आणि पत्रात नेमकं काय म्हटलं होतं? याबाबत एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे भाष्य केलं आहे.आमच्यावर फक्त आरोपच आरोप करत आले आहेत आरोप करण्याचा अधिकार

तुम्हाला आहे का पन्नास खोके 50 खोके सर्व नेते मंडळी समोर आहेत. शिवसेना सोडून इतर पक्षातील नेते आपल्याकडे येत आहेत. आपल्याला जेव्हा शिवसेना मिळाली तेव्हा यांच्या पायाखालची वाळू घसरली

धडकी भरली. तुमची आम्हाला संपत्ती नको बाळा साहेब हीच आमची संपत्ती आहे. धनुष्यबान मिळाल्यावर शिवसेनेच्या खात्यातून 50 कोटी आम्हाला मिळाला पाहिजे असे पत्र आम्हाला पाठवलं.

यांना बाळासाहेबांची विचार नको त्यांना 50 कोटी देऊन टाकले. 50 कोटी मागताना तुम्हाला जनाची नाही तरी मनाची पाहिजे होती रोज तुम्ही कसे आरोप करताय, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

तुमच्यावर आलेली संकट मी छातीवर घेतली आहेत. माझ्याकडे खूप गोष्टी आहे, ज्या वेळेला बोलायची वेळ येईल त्यावेळी मी बोलेल. बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होतं आता मातोश्री

उदास झाली आहे. जिथे वाघाची डरकाळी येत होते तेथे आता रडण्याचा आवाज येतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.दरम्यान, ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी केलं पाकिस्तानची मॅच होऊ नये

म्हणून कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियम तोडून टाकलं. ही शिवसेना कार्यकर्ते आहेत अशी कार्यकर्ते किती आहेत, जेलमध्ये गेलेलो शिवसेना अशीच मोठी झाली नाही रक्ताचे पाणी केलं लोकांनी घरावर तुळशीपत्र ठेवले.

आयत्या पिठावर रांगोळी काही नीट मारता आले नाही तुम्हाला असा कुठला पक्ष प्रमुख असतो का त्याचा पान उतार करायचा असतो का मनोहर जोशींना भर व्यासपीठावरून उतरवण्याचं काम तुम्ही केलं.

कदमांचा मनोहर पंत करायचा होता. नारायण राणे राज ठाकरे असतील त्यांनी काय मागितले होते तुम्हाला यांचा त्रास होता, असा सवाल करत शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!