Monday, March 2, 2026

स्वस्तामध्ये सोन्याचे अमीष दाखवुन लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन माळी चिंचोरा फाटा परिसरातजेरबंद

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

स्वस्तामध्ये सोने देतो अशी अमीष दाखवुन लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद करण्यात आली असून आरोपीकडुन ६ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी अरविंद सिध्दप्पा हलसांगी रा. लेन.नं.०२ गणेशनगर, नारायण अपार्टमेंट वाघोली, जि.पुणे यांना दि. २५/०२/२०२६ रोजी दुपारी ०३ वाजेचे सुमारास शेख उर्फ बंटि संजय पाडळे रा. देवगाव ता. नेवासा याने फिर्यादचा विश्वास संपादन करुन किरण काळे रा. नेवासा तसेच ८ ते १० इसम यांनी संगणमत करुन स्वत्तात सोने देतो असे सांगुन नेवासा येथे नेवासा कडुन श्रीरामपुरकडे जाणारे रोडवर हॉटेल शिवम जवळ कच्या रस्त्याने उजव्या बाजुला कांद्याचे चाळीमध्ये बोलावुन घेवुन माझे मित्र आदित्य नागटिळे व अशोक शहाणे व मला काठीने व लाथाबुक्याने मारहाण करुन काठी व धारदार शस्त्राचा व पिस्तुलचा धाक दाखवुन माझे रोख रक्कम अॅप्पल कंपनीचा मोबाईल व माझ्या मित्राचे २ विवो मोबाईल २ नग सोन्याच्या अंगठ्या असे एकुण १५ लाख ६५ हजार रुपये किमतीची मुद्देमाल बळजबरीने काढुन घेतली आहे. सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. १६३/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१० (२), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी तात्काळ ताब्यात घेणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना आदेशित केले होते.
त्यानुसार पो.नि. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे हरिष भोये पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, दिपक घाटकर, फुरकान शेख, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी तात्काळ ताब्यात घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.

वर नमुद पथकाने दरोड्याचे गुन्ह्यामधील आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना पथकास दि. २८/०२/२०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा शेखर उर्फ बंट्टी संजय पाडळे रा. देवगाव ता. नेवासा त्याचे इतर साथीदारास केला असुन तो नेवासा, माळी चिंचोरा फाटा परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ नेवासा ते छत्रपती संभाजीनगर जाणारे रोडवर माळी चिंचोरा फाटा परिसरामध्ये सापळा रचुन थांबले असता पथकास सदर परिसरात दोन इसम संशयीतरित्या फिरतांना दिसुन आले. तेव्हा पथकाने त्यांना शिताफिने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे १) शेखर उर्फ बंट्टी संजय पाडळे वय – ३२ वर्षे रा. देवगाव ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, २) किरण बंडु काळे वय २९ वर्षे रा. नागफनीवस्ती नेवासा ता. नेवासा जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. ताब्यातील शेखर उर्फ बंट्टी संजय पाडळे याचेकडे व्यवसायीक कौशल्याचे आधारे सखोल तपास करता त्याने वरील प्रमाणे गुन्हा हा त्यांचे साथीदार

३) भाऊसाहेब छगन भोसले रा. नेवासा फाटा, ता. नेवासा, ४) सचिन उर्फ गटण्या पवार रा. खळवाडी, नेवासा खु ।। ता. नेवासा व त्याचे ८ ते ९ अनोळखी साथीदार यांचेसह गुन्ह्या केल्याची कबुली दिली आहे.

आरोपीचे कब्जातुन गुन्ह्याचे वेळी वापरलेली ३५,०००/- रुपये किमतीची एक गावठी कट्टा (अग्निशस्त्र) व दोन जिवंत काडतुसे, ३०,०००/-रु कि.चा एक मोबाईल, ६,००,०००/- रु रोख रक्कम असा एकुण ६,६५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी नामे किरण बंडु काळे याचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत…

नेवासा पोलिस ठाणे गु.र.न.
१०६/२०१४ भा.द.वि.क. ३१६,३२३,५०४,५०६,३४
नेवासा पोलिस ठाणे गु.र.न.
४२/२०१४ आर्म अॅक्ट ३/२५
नेवासा पोलिस ठाणे गु.र.न.
४७/२०१५ आर्म अॅक्ट ३/२५.७
राहाता पोलिस ठाणे गु.र.न.
६१/२०१६ भा.द.वि. कलम ४५७.३८०
राहाता पोलिस ठाणे गु.र.न.६७/२०१६ भा.द.वि. कलम ३९४,४५७,३४
राहाता पोलिस ठाणे गु.र.न.६८/२०१६ भा.द.वि. कलम ३०९
कोपरगाव तालुका पोलिस ठाणे गु.र.न.१०१/२०१८ भा.द.वि. कलम २२४,४२७,३४,१२०(ब)
एम.आय.डी.सी पोलिस ठाणे गु.र.न.
११४/२०१८ भा.द.वि. कलम ४५२,१४३,१४७,५०४
कोपरगाव तालुका पोलिस ठाणे गु.र.न. १०७/२०१८ भा.द.वि. कलम ३९६,३९५ मोक्का

गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर पोलिस ठाणे गु.र.न.१६२/२०१३ भा.द.वि. कलम ४५७,३८०

आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी नेवासा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास नेवासा पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुबर्मे।यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!