नेवासा/प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वांजोळी व घोडेगाव ता. नेवासा येथे गावठी कट्टा (अग्निशस्त्र) बाळगणारे ०२ आरोपीकडुन ०२ गावठी कट्टे व ०४ जिवंत काडतुसे हस्तगत केले.
याबाबद अधिक माहिती अशी की,
मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि /हरिष भोये पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, दिपक घाटकर, फुरकान शेख, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास नेवासा तालुक्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
दिनांक २८/०२/२०२६ रोजी नमुद पथक हे सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे नितीन उर्फ ठकण भाऊसाहेब आल्हाट रा. मोरेचिंचोरे ता. नेवासा हा चारचाकी वाहनातुन गावड्डी कट्टा विक्री करण्यासाठी वांजोळी शिवारात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी वांजोळी शिवारात सापळा लावला थांबले असता, वांजोळीकडून एमआयडीसीकडे एक पांढ-या रंगाची चारचाकी वाहन येतांना दिसली. तेव्हा पथकाने चारचाकी वाहन थांबविले असता. तेव्हा गाडीतील चालक वाहन थांबवुन पळून जावुन लागला तेव्हा पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव नितीन उर्फ ठकण भाऊसाहेब आल्हाट वय ३४ वर्षे रा. मोरेचिंचोरे ता. नेवसा जि. अहिल्यानगर असे असल्याचे कळविले. ताब्यातील इसमाची व कारची झडती घेतली असता त्याचे कब्जातुन १) ३०,०००/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र), १०००/-रु कि, चे दोन जिवंत काडतुसे, ५,००,०००/-रु कि.चे मारुती सुझुकी चारचाकी वाहन असा एकुण ५,३१,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अ.नं.
आरोपी नामे नितीन उर्फ ठकण भाऊसाहेब आल्हाट याचेविरुध्द वापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत
सोनई, पोलीस ठाणे गु.र.नं.
६०/२०१४ आम अॅक्ट ४/२५
एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम ११२/२०१५ भा.द.वि. कलम ३९४,३९५,४२७,३४
येरवडा पोलीस ठाणे गु.र.नं.
१५६/२०१७ भा.द.वि. कलम ३६३,३६६ (अ),३७६
सोनई पोलीस ठाणे गु.र.नं.
३५२/२०२१ भा.द.वि. कलम ३०७,३२४,५०४, आर्म अॅक्ट ४/२५
सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. ३२६/२०२१ भा.द.वि.क. ३२४,३२३,५०४,५०६, आर्म अॅक्ट ४/२५सोनई पोलीस ठाणे गु.र.नं.
३३७/२०२१भा.द.वि.क. ४५२,३२४,३२३,५०४ आर्म अॅक्ट ४/२५नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. ९१५/२०२२ भा.द.वि. कलम ३९४,३४
सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. २९८/२०२२ भा.द.वि, कलम ३०७,३२४,५०६, आर्म अॅक्ट ३/२५
भिंगार कैम्प पोलीस ठाणे गु.र.नं.
९९/२०२४ आर्म अॅक्ट ३/२५, ७
ताब्यातील इसमाविरुध्द पोहेकों /४३७ सोमनाथ आसमानराव झांबरे नेम स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. ७८/२०२६ आर्म अॅक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
तसेच वरील नमुद पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख हा चारचाकी वाहनातून गावठी कट्टा विक्री करण्यासाठी घोडेगाव शिवारात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी घोडेगाव शिवारात सापळा लावला थांबले असता. राजेगावकडुन घोडेगावकडे एक पांढ-या रंगाची चारचाकी वाहन येतांना दिसली. तेव्हा पथकाने चारचाकी वाहन थांबवुन चालकास ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख वय-३१ वर्षे रा. कृष्णानगर झोपडपट्टी घोडेगाव ता. नेवासा असे असल्याचे कळविले. ताब्यातील इसमाची व कारची झडती घेतली असता त्याचे कव्जातून १) ३०,०००/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र), १०००/-रु कि. चे दोन जिवंत काडतुसे, ४,००,०००/-रु कि.ची मारुती सुझुकी चारचाकी वाहन असा एकुण ४,३१,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी नामे शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख याचेविरुध्द यापूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत
पोलीस ठाणे,गु.र.नं. व कलम असे…
सोनई, जि. अहिल्यानगर ७७/२०१६ भा.द.वि.क. ३२४,३२३,५०४,५०६,३४
सोनई.जि. अहिल्यानगरन५८/२०१६ भा.द.वि. कलम ३५४,३२३,३२४,५०४,५०६
सोनई.जि. अहिल्यानगर ९८/२०१६ भा.द.वि. कलम ३९९,४०२ आर्म अॅक्ट ४/२ सोनई, जि. अहिल्यानगर
१११/२०१६ भा.द.वि. कलम १४३.३२३,५०४ एम.आय.डी.सी.जि. अहिल्यानगर २२७/२०१६ आर्म अॅक्ट ४/२५वाळूज जि.छ. संभाजीनगर १६६/२०१६ भा.द.वि.क. ३७९ सोनई, जि. अहिल्यानगर ८८/२०१७ भा.द.वि. कलम ३९५.३९४, ५०६,३४,३४
सोनई, जि. अहिल्यानगर ३९८/२०२० साथरोग का. क. २,३ सोनई, जि, अहिल्यानगर?१७२/२०२१ भा.द.वि.क. ३२४, ३२३,५०४,५०६
सोनई, जि. अहिल्यानगर २६१/२०२१ आर्म अॅक्ट ३/२५, ७/२५
सोनई, जि. अहिल्यानगर १६१/२०२२ भा.द.वि.क.३२४,३२३,४२७,५०४,५०६ सोनई, जि, अहिल्यानगर १०८/२०२३भा.द.वि.क.३२४,३२३,५०४,५०६ आर्म अॅक्ट ३/२५
सोनई, जि. अहिल्यानगर २२६/२०२३ भा.द.वि.क. १४३,१४७,१४९,३२४ आर्म अॅक्ट ४/२५
शनि शिंगणापुर, अहिल्यानगर
१७९/२०२३. आर्म अॅक्ट ३/२५, ७
सोनई, जि. अहिल्यानगर २१४/२०२४ भा.द.वि.क.१४३,१४७,१४९,३८७,३२३ सोनई, जि. अहिल्यानगर ४७३/२०२४ बी.एन.एस.क. १३७ (२),११५ (२), ३५२ (२),३(५)
सोनई, जि. अहिल्यानगर १९६/२०२५ बी.एन.एस.क. ११८ (१), ११५ (२),३५२.३५१(२) सोनई, जि. अहिल्यानगर ४४५/२०२५ बी.एन.एस.क. १८९(२),१८९ (४),१९१(२) (३),१९०,११८(१)
ताब्यातील इसमाविरुध्द पोकों/७८२ किशोर आबासाहेब शिरसाठ नेम स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. ७९/२०२६ आर्म अॅक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
वरील प्रमाणे सोनई पोलीस स्टेशन हद्दीत दोन आरोपीविरुध्द कारवाई करुन त्यांचेकडुन ०२ गावड्डी कट्टे व ०४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, व श्री वैभव कलुबमें, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


