माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर येताना दिसत आहे. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांना ठाकरे गटाच्या माजी महिला
जिल्हाध्यक्षांकडून चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच काही मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. अहमदनगर जिल्हा न्यायालयात घडलेल्या
या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता. न्यायालयात उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच ठाकरे गटाच्या माजी जिल्हाध्यक्ष स्मिता अष्टेकर यांना रोखले आणि ताब्यात घेतले.राहुरी येथे वकील दांपत्याच्या
हत्येनंतर वकिलांनी वकील सुरक्षा कायदा लागू करावा ही मागणी केली होती. त्यानुसार सुषमा अंधारे यांनी शनिवारी (17 फेब्रुवारी 2024) अहमदनगर जिल्हा न्यायालयामध्ये अहमदनगर बार असोसिएशनच्या
वकिलांची भेट घेतली. मात्र या भेटीदरम्यान सुषमा अंधारे यांना धक्काबुक्की आणि त्यांच्यावर चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न झाल्याने एकच गोंधळ उडाला.सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी देवतांचा अपमान वारंवार केला आहे आणि त्यामुळे उद्धव
ठाकरे गटाच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष स्मिता अष्टेकर तसेच मनसेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी अंधारेंना न्यायलातच विरोध करून चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, हा विरोध कशासाठी
होता मला याची जाणीव नाही मात्र स्टंटबाज करणाऱ्या महिलांना कॅमेरा लागतो कदाचित कॅमेऱ्यासमोर येण्यासाठीच हा स्टंट करण्यात आला असावा.तर सुषमा अंधारे यांच्याकडून वारंवार हिंदू देवी देवतांचा अपमान
करण्यात आला आहे, मी देखील गेल्या 30 वर्षांपासून उद्धव ठाकरे तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत काम करत होते. मात्र ज्या महिलेने देवी-देवतांचा अपमान केला त्या महिलेला बाळासाहेबांनी देखील स्वीकारलं नसतं आणि म्हणूनच
आता आम्ही सुषमा अंधारे यांना विरोध केला. तसेच यापुढे ते अहमदनगर जिल्ह्यात आले तर त्यांना मारहाण केल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष स्मिता अष्टेकर यांनी दिली आहे.