Monday, May 27, 2024

सावधान:गरोदरपणात महिलांना ‘या’ आजारांचा सर्वाधिक धोका असतो…

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:प्रत्येक महिलेसाठी गर्भधरणेचा काळ हा सर्वात सुखाचा आणि अविस्मरणीय क्षण असतो. मात्र, हा काळ तितकाच आव्हानात्मक देखील असतो.

या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. ज्यामध्ये हार्मोन्स महत्त्वाची भूमिका बजावतात.अशा वेळी महिला शारीरिकदृष्ट्या अशक्त होतात. त्यांच्यात अशक्तपणाची कमतरता सतत जाणवत असते.

आणि त्यामुळे अनेक आजारांचा धोका देखील तितकाच वाढतो.यामुळेच महिलांना गरोदरपणात स्वतःची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून आई आणि बाळ दोघांचंही आरोग्य चांगलं राहील.

गरोदरपणात महिलांना कोणत्या आजारांचा सर्वात जास्त धोका असतो या सदंर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.उच्च रक्तातील साखरेची पातळी गर्भवती महिला आणि गर्भातील बाळ दोघांसाठीही घातक ठरू शकते. हे टाळण्यासाठी,

नियमित तपासणी करा.गर्भवती महिलांना थायरॉईडचा धोकाही खूप जास्त असतो. गर्भधारणेदरम्यान थायरॉईड ग्रंथी वाढते. त्यामुळे हार्मोन्सची पातळी असंतुलित होते.गर्भधारणेदरम्यान मूत्रमार्गाशी संबंधित समस्या वाढू शकतात.

गर्भवती महिलांमध्ये गर्भाशयाचे संक्रमण सामान्य आहे. अशा वेळी गर्भवती महिलांनी आपल्या अंतर्गत भागाची काळजी घ्यावी.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!