Wednesday, August 17, 2022

केक आणि पेस्ट्रीतून हाय प्रोफाईल लोकांना होत होता हा पुरवठा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एनसीबीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे एनसीबी अधिकाऱ्यांनी यावेळी थेट एका बेकरीवर छापा टाकला. एनसीबीची ही कारवाई यशस्वी ठरली. कारण या बेकरीमध्ये प्रचंड महाग असलेला 160 ग्रॅम गांजा मिळाला आहे.

विशेष म्हणजे एनसीबीने पहिल्यांदाच अशा ड्रग्ज बेकरी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ड्रग्ज माफिया कोणकोणत्या मार्गाने ड्रग्जची तस्करी करतात हे आता यातून स्पष्ट होताना दिसत आहे .मालाड येथील एका बेकरीतून ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर अधिकाऱ्यांनी कारवाई केली.

अधिकाऱ्यांनी संबंधित बेकरीत थेट छापा टाकला. यावेळी एका डब्ब्यात अधिकाऱ्यांना 160 ग्रॅम गांजा मिळाला. पोलिसांनी बेकरीतील कर्मचाऱ्यांची चौकशी केला तेव्हा सर्व प्रकार उघड झाला .

बेकरीतून केक आणि पेस्ट्रीद्वारे हाय प्रोफाईल परिसरातील नागरिकांना ड्रग्ज पुरवठा केला जायचा. एनसीबी अधिकाऱ्यांनी बेकरीतील सर्व ड्रग्ज ताब्यात घेतलं. तसेच बेकरीतील तिघांना अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास अधिकारी करत आहेत. तसेच या कारवाईतून ड्रग्ज माफियांच्या आणखी मोठ्या जाळ्याचा भंडाफोड होण्याचा अंदाज आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!