Thursday, April 25, 2024

18 लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचे लक्ष, ‘या’ नेत्यांवर विशेष जबाबदारी तर शिर्डीत…

IMG-20240312-WA0002
IMG-20240411-WA0003
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा निवडणुकीचं रणशिंग आता लवकरच फुंकल जाणार असून देशभरात निवडणूकीचे वारे वाहू लागतील. भाजप,

काँग्रेससह सर्वच पक्ष आगामी निवडणुकांसाठी सज्ज होत असून जय्यत तयारीलाही सुरूवात झाली आहे. येत्या काही दिवसांतच निवडणुकांचे पडघम वाजू लागतील. याच पार्श्वभूमीवर शिवसेना

ठाकरे गटही लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला असून कसून तयारी सुरू आहे. शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा निवडणूक समन्वयक जाहीर करण्यात आले आहेत.

लोकसभा समन्वयकांमध्ये अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. समन्वयक नेमून स्वत:चे 18 मतदारसंघ जाहीर केल्याचे संकेत देण्यात आले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह

वक्तव्य केल्याने अटक करण्यात आलेले मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांच्यावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

तर मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्याची जबाबदारी ही किशोर पोतदार, सुभाष म्हसकर या दोघांवर सोपवण्यात आली आहे. आमदार विलास पोतनीस यांच्यावर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार

संघाची आणि माडीआमदार संजय कदम यांच्याकडे रायगड लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत

लोकसभा समन्वयक पुढीलप्रमाणे –

जळगाव : सुनील छबुलाल पाटील

बुलढाणा : राहुल चव्हाण

रामटेक : प्रकाश वाघ,

यवतमाळ : वाशीम – उद्धव कदम

हिंगोली : संजय कच्छवे

परभणी : शिवाजी चोथे, संतोष सांबरे

जालना : राजू पाटील

संभाजीनगर : प्रदीपकुमार खोपडे

नाशिक : सुरेश राणे

ठाणे : किशोर पोतदार, सुभाष म्हसकर

मुंबई उत्तर पश्चिम : विलास पोतनीस

मुंबई उत्तर पूर्व ( ईशान्य) : दत्ता दळवी

मुंबई दक्षिण मध्य : रवींद्र मिर्लेकर

मुंबई दक्षिण : सुधीर साळवी, सत्यवान उभे

रायगड : संजय कदम

मावळ : केसरीनाथ पाटील

धाराशीव : स्वप्नील कुंजीर

कोल्हापूर : सुनील वामन पाटील

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!