माय महाराष्ट्र न्यूज:मनोज जरांगे मारुतीचं शेपूट आहे. तो शांत बसणार नाही. गाडी ताब्यात घा, निवडणूका घेऊ नका असं म्हणत आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आमदार
छगन भुजबळ यांनी केला. मराठा आरक्षणावरुन छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वाद सुरु आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मराठ्यांना
ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे. तर ओबीसींना स्वतंत्र आरक्षण द्या, असे भुजबळांचं म्हणणं आहे. त्यावरुन दोघांमध्ये शाब्दिक फैरी झडत आहेत. आता मुंबईमध्ये बोलताना छगन
भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. मनोज जरांगे मारुतीचं शेपूट आहे, तो शांत बसणार नाही, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलेय. मनोज जरांगेना काही कळत नाही. विनाकारण गावबंद करा म्हणताय.
वयस्कर लोकांना उपोषणाला बसवताय, त्यांना काही झाले तर काय करायचं? सर्वबाबी सरकार सकारात्मक विचार करताय, परंतु गैरसमज निर्माण करताय. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ते वाटेल ते बोलतात.
10 तारखेला उपोषणाबाबत समाजातील लोकांना विचारले नव्हते, श्रेय वादासाठी स्वतः:हुन हे उपोषणाला जाऊ बसले, असा आरोप भुजबळांनी यावेळी केला. सरसकट आरक्षण देता येणार नाही, सगेसोयरे
हा शब्द कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही . कोर्टात याला विरोध होणार आहे. मराठा मतं जरांगे यांनी भडकवतील. ते आपली मते विरोधात जातील म्हणून सावध भुमिका घेतली जात आहे, असे भुजबळ म्हणाले.
जर वयस्कर लोकांच्या जीवाला काही झाले तर पोलिसांनी जरांगे यांना कारणीभूत धरावे. बारावी परीक्षा सुरू आहेत, हे रस्ते बंद करतात. त्यांना जनतेसाठी काही वाटत नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हे
रस्त्यांवर उतरा सांगतात. 10 तारखेला उपोषणाला बसले होते, त्यावेळी कोणताही विचार समाजाला घेऊन जरांगे यांनी केला होता का? सगेसोयरे हा शब्द कायद्यात बसत नाही. एखाद्याचे वडील शेड्युल कास्ट असतील तर प्रमाणपत्र त्यांना मिळेल ? असे भुजबळ म्हणाले.
बारसकर यांची व्हायरल क्लिप मी पाहीली होती, त्यांना धरून विधानसभेत बोललो. ते 2006 पासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा लढताय, ते जरांगे सोबत असायचे. त्यांच्या गुप्त बैठक, बेताल वक्तव्ये याला कंटाळून ते बोलत आहेत, असे छनग भुजबळ म्हणाले.