माय महाराष्ट्र न्यूज: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (CBI) अप्रेंटिसशिपसाठी 3000 पदासाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. अप्रेंटिसशिपपदासाठी अर्ज करताना नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS)च्या अधिकृत वेबसाइटवर nats.education.gov.in जाऊन अर्ज करु शकता.
या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किंवा संस्थेतून पदवीधर असणे गरजेचे आहे. तसंच, उमेदवाराचा जन्म 11 एप्रिल 1996च्या आधी आणि 31
मार्च 2004 नंतर झालेला नसावा. अर्ज करताना उमेदवारांना NATS च्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकता. लक्षात घ्या की, फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करु शकता. अर्ज करतानाच काही ठराविक
रक्कम भरावी लागते. रक्कम भरल्यानंतरच तुमचा फॉर्म स्वीकारला जातो. अर्जाची रक्कम जनरल, ओबीसी वर्गासाठी 800 रुपये तर, एससी, एसटी ईडब्लूएस वर्गासाठी 600 रुपये आणी
पीएच उमेदवारांसाठी 400 रुपये व सर्व उमेदवारांसाठी 600 रुपये इतके अर्जाचे शुल्क भरावे लागणार आहे.