Sunday, October 6, 2024

विखेंचे सर्वात मोठे विधान:तर मी राजकारणातून संन्यास घेईल

माय महाराष्ट्र न्यूज:महानंदची गोरेगाव येथील ५० एकर मोक्याच्या ठिकाणची जागा अदानी यांना विकण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी

 

पशुसंर्वधन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केला होता. त्याला विखे पाटील यांनी उत्तर दिले असून राऊत यांनी हा आरोप सिद्ध करून दाखविला तर राजकारणातून संन्यास

 

घेऊन अन्यथा राऊत यांच्याविरूद्ध न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे, अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी व्यक्त केली.विखे पाटील यांनी नगरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले,

 

मी वारंवार सांगत आलेलो आहे खासदार संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. ते जी मुक्ताफळे उधळत आहेत, खरेतर त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. ते कोणत्या ५० एकर जमिनीचे

 

आरोप करत आहेत, हे त्यांनाच माहिती. मी आत्तापर्यंत पुष्कळ सहन केले तसेच काही पथ्य देखील पाळत आलो आहे. परंतु ते महानंदबाबत बेताल वक्तव्य करत असेल तर त्यांनी त्याचे परिणाम भोगायला तयार राहावे.

 

त्यांनी व्यक्तिगत जीवनात काय केले, कोणाचे घर फोडले, हे मलाही सांगावे लागेल. तुम्ही ५० एकरचा दावा करत आहे, तो सिद्ध करावा. सिद्ध न केल्यास त्याचे परिणाम भोगायला तयार राहा. पण त्यांनी जर

 

आरोप सिद्ध केले तर मी राजकारणातून संन्यास घेईल, असेही विखे म्हणाले.राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांच्याविरुद्ध आता

 

अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. त्यांनी आरोप सिद्ध केल्यास राजकारणातून संन्यास घेईल, असा इशारा त्यांनी दिला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!