माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य व अंत्योदय योजनेतील सर्व लाभार्थ्यांना वर्षातून १० किलोंच्या दोन विणलेल्या पिशव्या दिल्या
जाणार आहेत. राज्यात अशा सुमारे १ कोटी ६० लाख पिशव्यांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय अन्नधान्य महामंडळाला पिशव्या खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
येत्या महिनाभरात त्यांचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. रेशन धान्याची गुणवत्ता, त्याचे प्रमाण, उपलब्धता आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून होणारा खर्च यासंदर्भात ग्राहक
तसेच अन्य घटकांकडून केंद्रीय ग्राहक कल्याण अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडे वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.ही समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला दहा किलोंची विणलेली
पिशवी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सहा महिन्यांतून एक अशा वर्षातून दोन पिशव्या देण्याचे या निर्णयानुसार ठरले आहे. यासाठी भारतीय अन्न महामंडळाने बॅग खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली
असून, राज्यासाठीच्या मुंबई कार्यालयातून यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.लाभार्थ्यांची संख्या:अंत्योदय योजना: २४,७८,५९५,प्राधान्य योजना:१,०३,६५,२२० .