Monday, October 14, 2024

कांगोणी येथील रावडे यांचा जिल्हा परिषदे समोरील अवयव दान आंदोलनाचा ९ वा दिवस

नेवासा

नेवासा तालुक्यातील कांगोणी येथील सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे यांनी विविध मागण्यांसाठी दि.२० फेब्रुवारी पासून नगर येथे जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेल्या आंदोलनाचा ९ वा दिवस असून रावडे यांच्या तक्रारींची मुद्देनिहाय चौकशी करून आवश्यकतेनुसार व नियमानुसार उचित कार्यवाही अनुसरून सकृत दर्शनी तथ्य आढळल्यास आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत अर्जदार यांना आपले स्तरावरून कळविण्यात यावे व त्यांना उपोषणा पासून परावृत्त करावे अशी सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांनी नेवासा पंचायत समितीचे
गट विकास अधिकारी यांना दिली आहे.

समाजहितासाठी वेळोवेळी केलेल्या तक्रारींनुसार कारवाई करावी, आपणाला शक्य असल्यास त्यानुसार तातडीने चौकशी, कारवाई करावी किंवा त्या तक्रारींनुसार कारवाई करणे शक्य नसल्यास माझ्या दोन्ही किडण्या, इतर किंमती अवयव कडून घेऊन त्यापासून मिळणारी रक्कम महाराष्ट्र शासनाला जमा
करावेत असे निवेदन श्री.रावडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते.सदर निवेदनानुसार कारवाई न झाल्यास दि. २० फेब्रूवारी २०२४ पासून जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत माझ्या संपूर्ण शरीराचे महाराष्ट्र शासन दान घेऊन माझे शरीर जमा करून घेईपर्यंत बेमुदत देहदान आंदोलन करणार असा इशारा दिला होता,मात्र या निवेदनाची दखल न घेतल्याने श्री.रावडे यांनी दि.२० फेब्रूवारी पासून आंदोलन सूरु केलेले आहे. जिल्हा परीषद प्रशासनाने श्री.रावडे यांची समजूत काढून आंदोलना पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला मात्र रावडे आंदोलन सुरुच ठेवन्यावर ठाम आहेत.

त्यामुळे जिल्हा परिषेदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नेवासा पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांना नेवासा पंचायत समिती न अंतर्गत प्राप्त श्री. रावडे यांच्या तक्रारींची मुद्देनिहाय चौकशी करून आवश्यकतेनुसार व नियमानुसार उचित कार्यवाही अनुसरून सकृत दर्शनी तथ्य आढळल्यास आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत अर्जदार यांना आपले स्तरावरून कळविण्यात यावे व त्यांना उपोषणा पासून परावृत्त करावे. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. सदर बाबत कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे सूचित केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!