Monday, October 14, 2024

भाजपची पहिली लोकसभा उमेदवार यादी जाहीर अन् सुजय विखे-पाटलांचा सूर बदलला

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 195 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. अशातच अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी

केलेल्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे सुजय विखे-पाटील यांना भाजपकडून (BJP) लोकसभेची उमेदवारी मिळणार नसल्याची कुजबूज सुरु

झाली आहे. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरच्या जनतेशी संवाद साधताना, ‘तुम्ही खासदार करुन मला दूर लोटलंत. थोडे दिवस थांबा, मी कायमचा इकडे येईन’, अशा आशयाचे वक्तव्य केले आहे.

त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत भाजप धक्कातंत्राचा वापर करणार का, याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. सुजय विखे-पाटील

शनिवारी शिर्डीच्या नजीक असलेल्या राहता येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गटाच्या कार्यक्रमावेळी बोलत होते. यावेळी सुजय विखे यांनी उपस्थितांशी संवाद साधतान म्हटले की, “शिर्डी

मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो. मात्र, तुमच्यापासून दुरावला गेलो आहे. दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडेच (शिर्डी) येईल. काळजी करु नका.”, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले.

सुजय विखे-पाटील यांच्या या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सुजय विखे यांची ही बदललेली भाषा म्हणजे त्यांना अहमदनगरमधून लोकसभेची

उमेदवारी मिळणार नाही, याबद्दल कुणकुण लागल्याचा परिणाम आहे किंवा त्यांना यंदाच्या लोकसभेला निवडून येण्याबाबत साशंकता वाटत आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!