Monday, May 27, 2024

६०-७० टक्के महिलांना अजूनही PCOS चे निदान होत नाही, गर्भधारणेला होते बाधा

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:PCOS अर्थात पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही महिलांमधील हल्ली कॉमन समस्या झाली आहे. महिलांच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलनामुळे ही समस्या उद्भवते.

८ मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात येतो. प्रत्येक महिलेला आपल्या आरोग्याप्रती गोष्टी जाणून घेत स्वतःची काळजी घेण्याची पूर्ण गरज आहे. आजही प्रगत विज्ञाननंतरही अनेकदा

PCOS चे निदान लवकर होत नाही.जर PCOS चे वेळेवर निदान किंवा उपचार केले गेले नाहीत तर त्यामुळे अनेक दीर्घकालीन आरोग्य विकारांचा धोका वाढतो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,

महिलांमध्ये ही एक सामान्य समस्या असली तरी बहुतेकांना त्याबद्दल माहिती नसते. अभ्यासात असे आढळून आले आहे की सुमारे 70 टक्के महिलांमध्ये PCOS चे निदान होत नाही, त्यामुळे अनेक प्रकारचे रोग आंतरिकरित्या वाढतात.

PCOS झालेल्या महिलांच्या शरीरामध्ये एन्ड्रोजन नावाचे हार्मोन अधिक वाढते. एन्ड्रोजन हे मेल सेक्स हार्मोनच्या स्वरूपात ओळखले जाते. महिलांच्या शरीरात याचे प्रमाण वाढल्यास, मासिक पाळीशी

संबंधित समस्यांसह चेहऱ्यावर केस येणे आणि मानसिक आरोग्य संतुलन खराब होण्याचा धोकाही निर्माण होतो.जागतिक आरोग्य संस्था अर्थात WHO च्या म्हणण्यानुसार Reproductive Age Group दरम्यान ८-१३ टक्के

महिलांना पीसीओएस ही समस्या होऊ शकते. वास्तविक जगभरात साधारण ६० ते ७० टक्के महिलांना PCOS या आजाराने ग्रस्त आहेत मात्र त्याचे निदान लवकर होत नाही. विशेषतज्ज्ञांनुसार लवकर

याचे निदान न झाल्यामुळे अनेक महिलांना याबाबत माहिती नाही आणि त्यामुळे शरीराला अनेक त्रास होतात.अनेक महिलांना पीसीओएसची लक्षणेही दिसून येत नाहीत. तर अनेक महिला या डॉक्टरांकडे

जाण्यापासून आजही घाबरतात आणि स्पष्ट बोलत नाहीत. यामुळे या आजाराबाबत आजही कमी जागरूकता आहे. याची सामान्य काय लक्षणे आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे. तुम्हीही या महिला दिनानिमित्त याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

मासिक पाळीचा कालावधी कमी होण्यासह याची अनियमितता असण्याची अनेक कारणं असू शकतात. पण सतत अनियमित पाळी येत असेल तर त्याकडे त्वरीत लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

अशावेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा. मासिक पाळी सतत अनियमितपणे येत असेल तर पीसीओएसची समस्या असू शकते.आरोग तज्ज्ञांच्या मते, जर पीसीओएसकडे वेळीच लक्ष दिले नाही

तर याचा गंभीर परिणाम गर्भधारणा करण्यासाठी होतो. बाळ लवकर कन्सिव होऊ शकत नाही.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!