माय महाराष्ट्र न्यूज:सध्या देशातील सगळीच सरकार महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजना बनवत आहे. अनेक राज्यांची सरकार केंद्राच अनुकरण करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत
महिलांची मत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे महिला वर्गाला आकर्षित करण्याचा प्रत्येक राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. आता दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारने सोमवारी राजधानी
दिल्लीसाठी 76 हजार कोटी रुपयांच बजेट सादर केलं. दिल्लीच्या केजरीवाल सरकारने मागच्यावेळी 78 हजार कोटी रुपयांच बजेट सादर केलं होतं. यावेळी हे बजेट 2 हजार कोटी रुपयांनी कमी केलं.
बजेटची घोषणा करताना मंत्री आतिशी यांनी सांगितलं की, या वर्षी शिक्षणासाठी बजेटमध्ये 16393 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण बजेटच्या ही 21 टक्के रक्कम आहे.2013 साली आम्ही
राजकारणात आलो. त्यावेळी आम्ही लोकांना मतदान करण्यासाठी जातान पहायचो. लोक म्हणायचे की, मतदान केल्याने काय फरक पडतो?. नेते येत-जात असतात, पण त्याने आयुष्यावर काय
फरक पडतो. दिल्लीत राम राज्य साकारण्याचा आमचा संकल्प आहे. केजरीवाल सरकारच दहाव बजेट सादर करताना, मी हे दाव्यानिशी सांगू शकते की, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन
झालय. दिल्लीमध्ये प्रत्येक महिलेला 1 हजार रुपये देण्याची अरविंद केजरीवाल सरकारने मोठी घोषणा केली आहे. 18 वर्षावरील प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1 हजार रुपये देण्यात येतील.
मुख्यमंत्री महिला सम्मान योजनेतंर्गत ही रक्कम दिली जाईल.राम राज्याच स्वप्न साकार करण्यासाठी मागच्या 9 वर्षांपासून आम्ही दिवस-रात्र मेहनत घेतोय. राम राज्यासाठी आम्हाला अजून
बरीच मेहनत घ्यायची आहे. आधी लोकांना रुग्णालयात महागडी बिल भरावी लागायची. दागिने गहाण ठेवावे लागायचे. शिकून मुलांना नोकऱ्या मिळत नव्हत्या. अशावेळी अरविंद
केजरीवाल आशेचा किरण बनून आले. लोकांनी त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवला. मोठ्या बहुमताचा आशिर्वाद दिला.मंत्री आतिशी म्हणाल्या की, “2014 मध्ये GSDP 4.95 लाख
कोटी रुपये होता. आता त्यात चारपट वाढ झालीय. महसूलात सतत वाढ होतेय. 2014-15 मध्ये दिल्लीच बजेट 30950 कोटी रुपये होतं. 2024-25 मध्ये 76 हजार कोटी रुपयांच बजेट मी सादर करतेय.