माय महाराष्ट्र न्यूज:भंडारदरा लाभक्षेत्रातील सिंचन आणि बिगर सिंचनाचे ३० दिवसांचे आवर्तन गुरुवार, दि. ७ मार्च पासून सोडण्यात येणार आहे.
या बाबतच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या.या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी लाभक्षेत्रात पाण्याची वाढती मागणी तसेच उन्हाची
वाढलेली तीव्रता लक्षात घेऊन शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार जलसंपदा विभागाने दि. ७ मार्च ते ४ एप्रिल
पर्यंतच्या ३० दिवसांच्या आवर्तनाचे नियोजन करून, गुरुवार पासूनच भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.यावर्षी पावसाचे अत्यल्प राहिलेले प्रमाण आणि धरणातील पाणी साठ्याचा
विचार करून आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. या आवर्तनाचा या गावांनाही लाभ व्हावा या उद्देशाने सिंचन आणि बिगर सिंचन असे
सोडण्याच्या पाटील यांनी आहेत. एकत्रित आवर्तन सूचना मंत्री विखे विभागाला दिल्या.