भेंडा प्रतिनिधी :संपूर्ण भारतात सेंन्टम फाऊंडेशन माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिला, तरुण आणि मुलांचे प्रशिक्षण, शिक्षण आणि कौशल्य यासह राष्ट्रीय महत्त्वाच्या सामाजिक आणि धर्मादाय उपक्रम राबवते.
अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. हे फाऊंडेशन व्यावसायिक प्रशिक्षणाची सुविधा देते, भारताच्या सर्वसमावेशक दृष्टीला चालना देणारा एक महत्त्वाचा घटक जो ग्रामीण-शहरी भेद दूर करू पाहतो आणि दुर्गम भागात राहणाऱ्या
समुदायांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सेंटम फाऊंडेशनचे कौशल्य-निर्माण उपाय एक रोजगारक्षम आणि तयार करण्याचा प्रयत्न करतात. अहमदनगर येथे हेल्पर इलेक्ट्रिशियन, सहायक इलेक्ट्रिशियन, प्लंबर जनरल हे प्रशिक्षण आहेत.
या प्रशिक्षण अंतर्गत हेल्पर इलेक्ट्रिशियन व सहायक इलेक्ट्रिशियन यामाध्यमातून आतापर्यंत 301 पुरुष व महिला प्रशिक्षण देऊन त्यांना प्रमाणपत्र देऊन नोकरीची संधी फाऊंडेशन मार्फत मिळून देण्यात आलेली आहे. तर प्लंबर जनरल हा कोर्स सुरू करत आहे .
त्यामधून 250 पुरुष व महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर नोकरीची हमी,MEP क्षेत्रातील प्लेसमेंट सहाय्य, उद्योग चालित अभ्यासक्रम,समग्र व्यावसायिक विकास,इलेक्ट्रिकल्स व प्लंबिगमध्ये नोकरीसाठी प्रशिक्षण, अभ्यासक्रम प्रमाणात अशी ठळक वैशिष्ट्ये आहेत.
फाऊडेशनमार्फत युवक, महिला आणि सर्व समुदायातील तसेच समाजातील वंचित घटकांना रोजगार-संबंधित प्रशिक्षण देण्यासाठी परोपकारी कारणे हाती घेते. महिला कल्याण आणि सक्षमीकरण, कौशल्य आणि उपजीविका निर्मिती, व्यावसायिक
प्रशिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये सेंटम फाऊंडेशनच्या उपक्रमांचा दूरगामी प्रभाव पडतो. अहमदनगर येथे फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते आहे. बचत गट महिलांना मोठ्याप्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यातआलेली आहे.
महिलांना कायमचां रोजगारनिर्मिती साठी फाऊडेशन खूप चांगल्या पद्धतीने काम करत असलेले दिसून आलेले आहे.या प्रशिक्षणाची संपुर्ण जिल्हाभर चर्चा चालू आहे.नगर मधील महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण या फाऊडेशन कडून मोठ्या प्रमाणात होत असताना दिसत आहे.
फाउंडेशन मार्फत प्रशिक्षणाचे असेच कार्य पुढे ही चालू राहवे ही सर्व महिला वर्गातून इच्छा व्यक्त केली जात आहे.अधिक माहितीसाठी x-28 क्रॉम्प्टन ग्रीव्हज समोर, निंबळक रोड एम.आय.डी.सी.नागापूर अहमदनगर येथे संपर्क साधावा.