नेवासा
लाखों युवकांना रोजगार मिळवुन देणारी ध्येयवादी उद्योजिका तस्मिया शेख यांचा राज्य शासनाच्या वतीने सन्मान चिन्ह गौरव करण्यात आला.
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील उद्योजक अब्दुल हाफिज शेख यांच्या तस्मिया शेख या पत्नी असून
जॉब फेअर इंडिया,तस्मी स्किन,बेकवाल केक अशा विविध कंपन्याच्या संस्थापीका आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार,उद्योजकता व नवीन्याता विभाग, यांच्या वतीने राज्यात आयोजित करण्यात आलेल्या विभागीय नमो महारोजगार मेळाव्यामधे ठाणे,लातुर व इतर ठिकाणी कंपनी व युवांमधे समन्वय साधत उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नवीन्यता विभाग मंत्री मंगलप्रसाद लोढा, आयुक्त निधी चौधरी ,सहआयुक्त डी.डी. पवार तसेच आमदार निरंजन डावखरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितित सन्मान चिन्ह देत गौरव करण्यात आला.
तस्मिया शेख यांचे रोजगारावर गेले १० वर्षा पासुन कार्य सूरू असुन विविध राजकीय पक्ष तसेच संघटना,सामाजिक संस्था व पोलिस प्रसाशन यांच्या मध्यमातुन महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक आशा विविध ठिकानी आता पर्यंत ३०० पेक्षा अधिक नोकरी मेळावे आयोजित करत लाखों बेरोंजगारांना रोजगार मीळऊन देण्याकरिता त्या नेहमीच अग्रेसर राहील्या आहेत. तस्मिया या जॉब फेअर इंडिया,तस्मी स्किन,बेकवाल केक अशा विविध कंपन्याच्या संस्थापीका असुन उद्योग क्षेत्रात त्यांची उत्तम कामगीरी राहिली आहे.
या सन्मानाबद्दल बोलताना शेख यांनी राज्याचे मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे, ,उपमुख्यंमंत्री अजीतदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवनीस यांचे आभार व्यक्त करत याचे सर्व श्रेय रोजगार मंत्री मंगलप्रसाद लोढा,राज्य आयुक्त निधी चौधरी ,सहआयुक्त डी.डी.पवार ,सीएमओचे श्री. रजपुत ,मंगेश देसाई व जॉब फेअर इंडिया टिम यांना जाते असे सांगितले.