माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभेसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांच्या समावेशाची अपेक्षा असलेल्या भाजपच्या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
या यादीतील उमेदवारांची नावे ठरविण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रविवारी हाेऊ शकते.भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक,
हरयाणा आणि ओडिशाच्या उमेदवारांची निवड अपेक्षित आहे. मात्र, महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अपूर्ण राहिल्यामुळे या बैठकीत गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने लढलेल्या
२५ जागांवर उमेदवारांची निवड हाेणार काय, याची उत्सुकता लागली आहे. महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा नसलेल्या जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची
अपेक्षा व्यक्त केली जात आहे.भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. मागच्याच आठवड्यात भाजपाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली,
त्यानंतर शुक्रवारी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसने आपली पहिली
उमेदवार यादी जाहीर करताना महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा केलेली नाही. कारण दोन्ही पक्षांची घटक पक्षांसोबतची जागा वाटपाची बोलणी अजून अंतिम झालेली नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी 10 किंवा 11 मार्चला जाहीर होणार आहे असे बोले जात आहे. 10 मार्चला राजधानी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची
बैठक होणार आहे. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी भाजपकडून दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 150 हून अधिक उमेदवारांची नाव दुसऱ्या यादीत जाहीर केली जाणार आहेत.
यात महाराष्ट्रातील उमेदवाराची नाव असतील का? याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.