Monday, November 10, 2025

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, हा बडा नेता शिंदेंच्या सेनेत

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम होण्याआधीच घटक पक्षांत पडझड सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे

आमदार रवींद्र वायकर यांनी रविवारी सायंकाळी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटाचेच दुसरे नेते आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणमधील सभेत

बोलताना पक्षात मिळणाऱ्या वागणुकीवरून नाराजी व्यक्त केली आहे. अशात ठाकरे यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसचे नेते

संजय निरुपम यांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काठावर आलेल्या आपल्या नेत्यांना आवरायचे कसे याचा मोठा पेच महाविकास आघाडीतील पक्षनेतृत्वासमोर निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे आदल्याच दिवशी गोरेगाव येथे ठाकरे यांचे वायकर यांनी स्वागत केले होते. दुसऱ्या दिवशीच त्यांचे पक्षांतर झाले. हा पक्षप्रवेश होण्याआधी मुंबई महापालिकेने त्यांच्याविरोधातील आरोप मागे घेतले.

ठाकरे यांनी शनिवारी अंधेरी येथील एका कार्यक्रमात उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे संतापलेल्या संजय निरुपम यांनी

कोरोना काळातील गरिबांच्या खिचडी वाटप घोटाळ्यातील आरोपीची उमेदवारी जाहीर करण्याची घाई का? असा सवाल एक्स या समाज माध्यमातून केला. तर पत्रकार परिषद घेत कमिशनचा हिस्सा

पोहोचल्यानेच कीर्तिकरांना उमेदवारी दिली असा आरोप निरुपम यांनी ठाकरे गटावर केला आहे.पक्षातील वागणुकीवरून ठाकरे गटाचे नाराज नेते भास्कर जाधव यांनी चिपळुणात

रविवारी स्नेहमेळावा घेत नाराजी व्यक्त केली. माझी लढाई वैयक्तिक नाही, तर पक्षासाठी आहे; परंतु उशाजवळ साप ठेवून मी झाेपू शकत नाही. पक्षातीलच काही जण माझ्या विरोधात षडयंत्र रचताहेत.

स्वतः निष्ठेच्या गोष्टी सांगायच्या आणि पक्षात राहून पक्षाचीच वाट लावायची ही वृत्ती घातक आहे, अशा शब्दांत जाधव यांनी पक्षांतर्गत विरोधकांचा समाचार घेतला. सर्वांचा हिशेब चुकता केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!