माय महाराष्ट्र न्यूज:आमदार निलेश लंके आमच्यासोबत पाच सहा महिने होते, ते एक गेले तर पाच येतील असं सांगत शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव
आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागत करू असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी केलं आहे. आपण गडचिरोली लोकसभा
निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगत त्यांनी भाजपच्या जागेवर दावाही केला.पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अजित पवार गटाला रामराम करून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासोबत
जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना धर्मरावबाबा अत्राम म्हणाले की, निलेश लंके हे पाच सहा महिने आमच्याकडे होते. इकडची कामं आटोपून ते तिकडे गेले. एक निलेश लंके गेले तर पाच परत येतील.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा आहे. गुहागरमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची सभा घेऊन जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यांच्यासाठी आता राष्ट्रवादीच्या
अजित पवार गटाने पायघड्या घालण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना धर्मरावबाबा अत्राम म्हणाले की, भास्कर जाधव हे आमच्या
गटात आले तर त्यांचं स्वागत आहे. ते चांगले नेते असून पूर्वी आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षही होते.