माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवारांसोबत येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
निलेश लंके लवकरच ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र या सर्व अफवा असल्याचे स्पष्टीकरण स्वतः निलेश लंके यांनी दिले आहे.
तसेच शरद पवारांसोबत झालेल्या भेटीबाबतही त्यांनी खुलासा केला आहे.माझ्या प्रवेशाच्या अफवा आहेत. प्रवेश असता तर आणि कार्यकर्त्यांसोबत आलो असतो कोणीतरी अफवा पसरवत आहे.
मला माझ्या नेतृत्वाने सांगितलं तर नगरच्या जागांसाठी काम करेल. पक्षप्रवेशाविषयी अजून काहीच नाही. मोठ्या साहेबांनी याबाबत कुठलं तथ्य नसल्याचे सांगितले आहे. मी आता
दादांसोबत आहे असे निलेश लंके म्हणाले.तसेच माणूस हा नेहमी खेळाडू पाहिजे. स्पर्धा असो किंवा नसो स्पर्धेची तयारी करत असतो. मी खेळ खेळणारा माणूस आहे, मी नाश्ता करण्यासाठी
गेस्ट हाऊसला आलो होतो. त्यावेळी कोल्हे भेटले. अमोल कोल्हे यांचे महानाट्य झालं त्याच्यानंतर आमची चर्चा नव्हती त्यामुळे भेटलो,” असे म्हणत कोल्हेंच्या भेटीवरही स्पष्टीकरण दिले आहे.