Saturday, December 21, 2024

भाजपाच्या दोन बड्या नेत्यांच्या मुलांचे तिकीटं कापणार?भाजपचा १२ खासदारांना दणका

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा निवडणूक तोंडावर असताना महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागावाटपाच्या बैठका सुरु आहेत. महायुतीतील जागावाटपाचा तिढा अजून सुटला नसला

तरी भाजपच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील जागांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली.महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटला नसताना

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची दिल्लीत बैठक सुरू आहे. या बैठकीत २०१९ मध्ये भाजपने जिंकलेल्या २३ आणि हरलेल्या

२ जागांची चर्चा करण्यात आली. यामध्ये काही जागांवर उमेदवारांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार भाजप उमेदवारांची नावं जाहीर करताना धक्कातंत्राचा वापर करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे महाराष्ट्रातील काही विद्यमान खासदारांची तिकिटं कापणार असल्याची चर्चा सुरू झाली.

त्यानुसार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील दिग्गज मंत्री व उत्तर महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्यांचा मुलाचे, रावेरमधून रक्षा खडसे, जळगावमधून उन्मेष पाटील, बीडमधून प्रीतम मुंडे, सोलापूरमधून जयसिद्धेश्वर

शिवाचार्य स्वामी या भाजपच्या पाच, तर शिवसेनेकडून बुलढाणा येथून प्रतापराव जाधव, अशा महाराष्ट्रातील एकूण १२ विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

बैठकीत खालील नाव सीईसीकडे पाठवल्याची विश्वसनीय नेत्यांची माहिती –

नागपूर – नितीन गडकरी

जालना – रावसाहेब दानवे

चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार

पुणे – मुरलीधर मोहोळ

सांगली – संजयकाका पाटील

भिवंडी – कपिल पाटील

दिंडोरी – भारती पवार

बीड – पंकजा मुंडे

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!