Thursday, May 2, 2024

आधारकार्ड संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी:पुन्हा वाढवली सरकारने मुदत

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मोदी सरकारने फ्री आधार सविस्तर अपडेट करण्याची मुदत 14 मार्चहून 14 जून, 2024 रोजीपर्यंत वाढवली आहे. आता

देशातील कोट्यवधी लोकांना 4 महिन्यांचा कालावधी वाढून मिळाला आहे. समाज माध्यम X वर UIDAI ने याविषयीची पोस्ट केली आहे. युआयडीएआयने लाखो आधार कार्डधारकांना लाभ

मिळण्यासाठी फ्री ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा 14 जून 2024 रोजीपर्यंत वाढवली आहे. ही मोफत सेवा केवळ myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा

अधिक जुने असेल आणि अजून ते अपडेट केले नसेल तर ही संधी उपलब्ध झाली आहे.या निर्णयामुळे नागरिकांना कागदपत्रांआधारे myAadhaar पोर्टल https://myaadhaar.uidai.gov.in/ च्या

माध्यमातून 14 जूनपर्यंत मोफत बदल करण्यात येणार आहे. आधार कार्डमधील हा बदल केवळ ऑनलाईन अपडेशनसाठी आहे. पण तुम्ही आधार केंद्रावर जाऊन कागदपत्रांआधारे आधार कार्डमध्ये

बदल कराल तर त्यासाठी 25 रुपये शुल्क अदा करावे लागेल.आधार कार्ड अत्यंत आवश्यक पुरावा मानण्यात येतो. अनेक सरकारी आणि गैर सरकारी कामासाठी आधार कार्ड दाखवावे लागते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी

आधार कार्ड अपडेटविषयी निर्देश देते. सध्या आधार कार्डला 10 वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला असेल तर आधार कार्डमध्ये अपडेट मोफत करता येते.

ऑफलाईन असे करा अपडेट:https://shuvan.nrsc.gov.in/aadhaar/ या अधिकृत पोर्टलवर जा.आता जवळचे आधार केंद्र शोधण्यासाठी ‘निअर बाय सेंटर’ वर

क्लिक करा.तुमचा योग्य पत्ता द्या. लोकेशन व्हेरिफिकेशन होऊन जवळचे केंद्र सापडेल.पिन कोड टाकून सुद्धा तुम्हाला जवळचे आधार केंद्र सापडेल

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!