माय महाराष्ट्र न्यूज:नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरणमध्ये मेगा भारती सुरू झाली आहे.
या भरती अंतर्गत विविध पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या मेगा भरती प्रक्रियेत 5 हजारांहून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छक आणि पात्र उमेदवारांकडून
या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसंदर्भातील संपूर्ण तपशील जाणून घ्या.महावितरणने या भरती प्रक्रियेसाठी अधिकृत अधिसूनचा प्रकाशीत केली आहे. या भरती प्रकियेतून
5 हजार 347 पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. हे लक्षात घ्या की या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च आहे.
या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. पात्र उमेदवार अंतिम तारखेआधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. 20 मार्च 2024 च्या नंतर आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
पदांचे नाव आणि रिक्त पदांची संख्या
पदाचे नाव – विद्युत सहायक
रिक्त पदसंख्या – 5347 जागा
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
महावितरणने जारी केलेल्या अधिकृत नोटिफिकेशननुसार या भरती प्रक्रियेतून राज्यभरात ‘विद्युत सहाय्यक’ या पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीत निवड झालेल्ल्या
उमेदवारांना थेट महावितरणमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास बारावी उत्तीर्ण उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षेंदरम्यान असणे आवश्यक आहे.
विद्युत सहायकाला मिळणारे वेतन
पहिल्या वर्षी- एकूण मानधन रुपये 15000 रुपये
दुसऱ्या वर्षी – एकूण मानधन रुपये 16000 रुपये
तिसऱ्या वर्षी- एकूण मानधन रुपये 17000 रुपये
अर्ज प्रक्रिया
या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी 2024 मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीत सहभागी होण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/ या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकतात. 20 मार्च 2024 पर्यंत केलेले अर्जच ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यानंतऱ आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज शुल्क
या भरती प्रक्रियेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 250 रूपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 125 रूपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे. अर्ज करण्यापूर्वी
उमेदवारांना अधिकृत अधिसूचना वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उमेदवार https://www.mahadiscom.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन भरती संदर्भातील अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.